Thursday, 21 June 2018

महाराष्ट्र सदनात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा




नवी दिल्ली दि. 21 : महाराष्ट्र सदनात आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आयेजित कार्यक्रमात सर्व अधिकारी-कर्मचारी योगासने करून प्रफुल्लित झालीत.

कोपर्निक्स मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर आज सकाळी चौथ्या आंतरराष्ट्रीय  योग दिवसाचे आयोजन करण्यात आले. अंथरलेल्या कार्पेटवर  पहिल्या रांगेत निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव आभा शुक्ला, सहायक निवासी आयुक्त इशू संधू, विजय कायरकर अजित सिंग नेगी, तसेच महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी त्यांच्या कुटुंबासह योगासने  करण्यासाठी उपस्थित होती.

रोजच्या  दिनचर्येत स्वस्थ्य राहण्यासाठी व्यायामाला विशेष महत्व आहे.  बहुतेक लोक दररोज व्यायाम करीत असतात. मात्र, योग दिनानिमित्त सर्व अधिकारी-कर्मचारी  एकत्रित योग करण्यासाठी सदनाच्या प्रांगणात एकत्रित झाले. मोराराजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे प्रशिक्षक आर्दश तोमर यांनी यावेळी योगासन आणि प्राणायामांचे  प्रत्याक्षिक दाखवून प्रशिक्षण  दिले.

संगच्छध्वं संवदध्यं.........उपासते या प्रार्थनेन सुरूवात करून चलन क्रिया करायला लावली. यात  मानेचे, खांद्याचे  व्यायाम करून शरिराला योगासनासाठी सज्ज केले. यानंतर ताडासन, वृक्षासन, पडाहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, वक्रासन, मकारासन, भुजगांसन, शलभासन, सेतुबंधासन, उत्तान पदमासन, अर्ध हलासन, पवनमुक्तासन करून शवासनाने योगसानांचा शेवट केला.  

 श्री तोमर, यांनी प्रत्येक योगासनाचे महत्व स्पष्ट करून यापासून मिळणा-या लाभाबाबत सविस्तर माहिती दिली. कामकरी स्त्री-पुरूषांसाठी हे सर्व आसने अतिशय महत्वाची असल्याचे सांगुन, कामामुळे येणा-या तणाववर योगासनांमुळे ब-यापैकी नियंत्रण आणता येते, असेही श्री तोमर यांनी सांगितले.  

योग मध्ये आसनांसह प्राणायामालाही महत्व असल्याने आसने झाल्यावर प्राणायामाचे प्रशिक्षण दिले गेले. नाडीशोधन प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम करून शेवटी  ध्यान लावायला सांगितले. यामुळे मन आणि शरीर अगदी हलके होत असून दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळत असल्याचा संदेशही श्री तोमर यांनी दिला.

एकत्रित योगसने करते वेळी शेवट हा संकल्पाने होत असतो. सर्व अधिकारी-कर्मचा-यांनी सर्वे भवन्तु सुखिन............शान्ति: शान्ति: शान्ति: चा संकल्प  घेऊन योग साधनेचा अभ्यास पूर्ण केला.  


No comments:

Post a Comment