नवी
दिल्ली, 6 : महाराष्ट्र शासनाच्या वैविद्यपूर्ण उपक्रमांची माहिती
महाराष्ट्र बाहेर प्रभावीपणे पोहचविण्याचे उत्तम कार्य महाराष्ट्र परिचय
केंद्राद्वारे होत असल्याचे गौरवोद्गार राज्याचे
जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा.
राम शिंदे यांनी काढले.
प्रा.
शिंदे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक
दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देवून प्रा. शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी
जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश
भुयार, दैनिक सामनाचे ब्युरो चीफ निलेश कुलकर्णी उपस्थित होते.
प्रा.
शिंदे यांनी यावेळी, परिचय केंद्राच्या वैविद्य उपक्रमांबाबत माहिती जाणून घेतली. शासनातील
जनसंपर्क विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा, राज्य शासनाच्या विविध उपक्रमांबाबत समाज
माध्यमांद्वारे करण्यात येणारी प्रभावी प्रसिध्दी आणि कार्यालयाच्या वतीने
राबविण्यात येणारे विविध उपक्रमांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. माहिती व
जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने राजधानी दिल्लीत सुरु झालेले देशातील सर्वात जुने
कार्यालय असणारे महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे मराठी भाषा व संस्कृतीच्या प्रचार
प्रसारासाठीही महत्वाचे कार्य होत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
दिल्लीस्थित विविध
राज्यांच्या जनसंपर्क विभागांसोबत संपर्क व समन्वय साधून जनसंपर्क विषयक कार्यातील
सकारात्मक उपक्रमांच्या देवाण घेवाणीत या कार्यालयाच्या पुढाकाराबाबत श्री. कांबळे
यांनी माहिती दिली. दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, परिचय केंद्राची
विविध प्रकाशने आदींची माहिती श्री. कांबळे यांनी यावेळी दिली. परिचय केंद्राचे
ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन प्रा. शिंदे यांनी माहिती जाणून घेतली व
कार्यालयाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.
000000
रितेश
भुयार /वृत्त वि. क्र. 296/ दिनांक 06.08.2018
No comments:
Post a Comment