या रेल्वे मार्गामुळे इंदूर ते मुंबई प्रवास वेळ कमी होणार
नवी
दिल्ली , 19 : इंदोर (मांगलियागांव) – बुधनी या 205.5 किलो मिटर रेल्वे मार्गाला आज केंद्रीय
मंत्री मंडळाने मान्यता दिली. या रेल्वे मार्गामुळे इंदूर ते मुंबई प्रवास वेळ कमी
होणार आहे.
आज
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या
बैठकीत इंदूर (मांगलियागांव) ते बुधनी या भागातील
205.5 किलो मिटर रेल्वे मार्गाला पूर्ण विद्युतीकरणासह मान्यता मिळाली आहे.
या रेल्वे प्रकल्पासाठी अंदाजित खर्च
3261.82 कोटी रूपये आहे.
या रेल्वे मार्गाचा उद्देश प्रोदशिक असमतोल दूर करणे आणि मागास भागाचा विकास करणे
हा आहे. यामुळे या रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामुळे
जबलपूर ते इंदूर रेल्वे मार्गाचे अंतर 68 किलो मिटरने कमी होईल. इंदूर ते मुंबई आणि
दक्षिण भारताकडील रेल्वे प्रवासाच्या यामुळे वेळेत बचत होणार आहे. सध्या या
मार्गावरील प्रवास हा भोपाळ रेल्वे मार्गावरून होत असतो. नवीन प्रस्तावित रेल्वे मार्ग बनल्यामुळे या भागात औद्योगिक
वसाहत निर्माण होण्यास मदत होईल.
प्रस्तावित रेल्वे मार्गाचे काम बुधनी
रेल्वे यार्डपासून सुरू होईल. हे काम पुढे पश्चिम रेल्वे मार्गावरील इंदोर जवळील
मांगलियागांवपर्यत असेल. या मार्गावर 10 नवीन रेल्वे स्थानकेही उभाण्यात येणार
आहेत. यापैकी 7 स्थानकावर रेल्वे थांबणार आहे. या नवीन मार्गामुळे सिहोर, देवास
आणि इंदूर जिल्ह्याला लाभ होईल. बुधनी ते इंदूर दरम्यान थेट संपर्क स्थापित होईल.
No comments:
Post a Comment