नवी दिल्ली, 6 : शाळेतील विद्यार्थ्यांना कुटूंबातील सदस्य मानुन शिकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसुळ यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात म्हणाले.
परिचय केंद्रात आज राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसुळ यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयेाजित करण्यात आला. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री अडसुळ यांना शॉल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी श्री अडसुळ यांच्या पत्नी, त्यांचे आई-बाबा, श्री अडसुळ यांची दोन मुले, भाचा उपस्थित होते. यावेळी कुटूबांतील सदस्यांचाही गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. माहिती अधिकारी अंजु निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार, ग्रंथालयातील सदस्य, कार्यालयातील कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील बंडगरवस्ती या दुर्गमभागातील जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये श्री अडसुळ शिक्षक आहेत. यावर्षी महाराष्ट्रातुन एकमेव शिक्षक श्री अडसुळ यांची निवड करण्यात आली होती. 5 सप्टेंबर ‘राष्ट्रीय शिक्षक दिनी’ त्यांचा उपराष्ट्रापती एम. वैंकय्या नायडू यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांना कुटूंबातील सदस्य मानुन त्यांच्या छोटया-छोटया ईच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे श्री अडसुळ यांनी सांगितले. ‘आनंददायी शिक्षण’ असा उपक्रम श्री. अडसुळ यांनी शाळेत राबविला आहे. यासह विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून व्हिडीयो कॉन्फरसिंगव्दारे इतर राज्यातील शाळेंच्या विद्यार्थ्यांशी तसेच परदेशी शाळेतील विद्यार्थ्यांशी जोडण्याचा प्रयत्न श्री अडसुळ यांनी केलेला आहे. शाळेमध्ये कडक मुलाखती, बाहुली नाटय अशा माध्यमातुन विद्यार्थ्यांना शिकवतात. बेरजेचे झाड, शब्द डोंगर अशी नावे देऊन गणित, मराठी भाषा विषय शिकवितात. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता विकसित व्हावी यावर भर देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे श्री अडसुळ म्हणाले.
श्री अडसुळ अंत्यत भावुक होऊन म्हणाले, शाळा अतिशय दुर्गम अशा भागात असल्यामुळे शाळेतील अधिकधिक विद्यार्थ्यी अतीशय हलाखीच्या परिस्थीतीत जगतात. त्यांना शाळेत येण्याची ईच्छा व्हावी, उत्सुकता असावी यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम शाळेत राबविले जातात.
शाळेच्या बांधकामापासून सुरूवात
बंडगरवस्तीतील जिल्हा परिषदेची शाळा सुरूवातीला पत्र्याची होती. डोंगरावरील या शाळेच्या बांधकामपासून सर्व काम शाळेच्या प्रमुख श्रीमती सविता बंडगर आणि श्री अडसुळ यांनी केलेले आहे. दोन खोल्याच्या या शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरतात.
आज ही शाळा संपूर्ण डिजीटल झालेली आहे. शाळेत संगणक, लॅपटॉप, प्रोजेक्टर, माइक, अशा सर्वच वस्तु आहेत.
शाळेतील विद्यार्थ्यी दर शनिवारी शैक्षणिक साहित्यांची निर्मिती करतात. तसेच अभ्यासक्रमा व्यतिरीक्त विषयांचा अभ्यास करतात.
श्री अडसुळ यांच्या उत्साही वृत्तीमुळे त्यांना राज्य शासनाने विविध अभ्यासक्रमाविषयक आयोजित प्रशिक्षणास जाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचाही फायदा त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांस तसेच राज्यातील इतर शिक्षकास आणि विद्यार्थ्यांस देण्याचा प्रयत्न श्री. अडसुळ करीत असतात. त्यांनी स्वत: बॉल्ग तयार केला असून या माध्यमातून सर्वांना माहिती देतात. यासह शिक्षकांचा ‘अॅक्टीव टिचर्स महाराष्ट्र’ असा समुह त्यांनी तयार केलेला आहे. या माध्यमातुनही शाळेतील राबवित असलेल्या चांगल्या प्रयोगाची माहिती राज्यभर पोहोचविली जाते. तसेच इतर शाळेतील चांगल्या उपक्रमांची माहितीचे आदान-प्रदान केले जाते.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
000000000
अंजुनिमसरकर/वि.वृ.क्र 333 / दि. 6-09-2018
No comments:
Post a Comment