नवी दिल्ली 5: फळांचा राजा असलेला “हापुस” आंब्याला बौध्दिक संपदा कायद्याअंतर्गत भौगोलिक मानांकन जाहिर झाले आहे. केंद्रीय आद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने आज मानांकनाची अधिकृत घोषणा केली. या मानांकनामुळे हापुस आब्यांची ओळख आता जागतिक पातळीवर अधोरेखित करण्यात आली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभु यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
रत्नागिरी, सिंधुर्दूग व लगतच्या परिसरातील हापुस आंब्यास हे मानांकन जाहिर करण्यात आले आहे, हे भौगोलिक मानांकन अशा उत्पादनांवर वापरले जाणारे चिन्ह आहे, ज्यामध्ये त्या उत्पादनाचा दर्जा आणि गुणवत्ता ही त्याच्या मुळ भौगोलिक स्थानावरुन ओळखली जाते. हापुस आंब्यास भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. कोकणातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला या भौगोलिक मानांकनामुळे बळकटी मिळणार आहे. केंद्र शासनाच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहान विभागाने हापुस आंब्यास हे मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न केले होते. नुकतेच केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभु यांनी भौगोलिक मानांकनाचा लोगो व टॅग लाईनचे अनावरण केले होते.
हापुसला कायद्याचे ‘कवच’
या मानांकनामुळे कोकण आणि लगतच्या भागातील आंबे वगळता इतर कोणत्याही आंब्यांना हापुस असे संबोधता येता येणार नाही किंवा त्यांची विक्री करताना हापुस असा उल्लेख करता येणार नाही. याआधी हापुस आंबा म्हणून कर्नाटक, आंध्रप्रदेश किंवा गुजरातचा आंबाही सरसकट विकला जायचा. यामुळे ग्राहकांची फसवणुक तर व्हायचीच तसेच कोकणातील हापुस उत्पादकांची ही नकुसान व्हायचे. त्यावर कायदेशीर कारवाही करणे शक्य होत नव्हते. हापुस आंब्याला आता भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे कायदेशीर कारवाही करणे शक्य होणार आहे.
सयुक्त अरब अमिराती हापुस चा सर्वाधिक चाहता
कोकणच हापुस आब्ंयास विदेशात सर्वाधिक मागणी आहे. सन 2018-19 या वर्षात परदेशात 26 हजार 937 मेट्रीक टन आंबा महाराष्ट्रातून निर्यात करण्यात आला होता, यामध्ये सर्व प्रकारच्या आंब्यांचा समावेश होता. हापुस ला सर्वाधिक मागणी ही सयुक्त अरब अमिरातीतून आहे. यावर्षी या भागात 13 हजार 984 मेट्रीक टन आंबा निर्यात केला गेला, यापैकी 60 टक्के आंबा हा हापुस होता. हापुसला जगभरातील इंग्लड, ओमान, कतार, कुवैत, सौदी अरेबिया, कॅनडा, फ्रान्स, सिंगापूर , जर्मनी, बहरीन, हॉगकॉग या देशातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. इंग्लड मध्ये यावर्षी 3310 मेट्रीक टन आंबा निर्यात केला गेला, यामध्ये 40 टक्केहुन अधिक हापुस आंब्याचा समावेश होता.
हापुस आंब्यास भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे आता हा आंबा निर्यात करतांना हापुस या नावाने निर्यात केला जाईल, यापूर्वी भारतीय आंबा या नावाखाली निर्यात होत होती. या मानांकनामुळे जागतिक बाजारपेठेत हापुस आंब्याची वेगळी ओळख निर्माण होणार आहे.
महाराष्ट्रातील 31 उत्पादनांना भौगोलिक मानांकन
देशातील 325 उत्पादनांना आजपर्यंत भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे, यामध्ये महाराष्ट्रातील 31 उत्पादनांचा समावेश आहे. या उत्पादनात सोलापूरी चादर, सोलापूरी टॉवेल, उपडा जमदानी साडी, पुणेरी पगडी, पैठणी साडी, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नासिकची द्राक्षे, वारली पेटींग, कोल्हापूरी गुळ, आजरा घनसाळ तांदुळ, वायगाव हळद, मंगळवेढा ज्वारी, भीवापूर मिरची, सिंधुदुर्ग व रत्नागिरी कोकम, वाघ्या घेवडा, नवापूर तुरडाळ, आंबेमोहर तांदुळ, वेर्गुला काजू, सांगली मनुका, लासलगाव कांदा, डहाणु घोळवड चिक्कु, बीडचे सिताफळ, जालन्याचे गोड संत्री, जळगावची केळी, मराठवाड्याचे केसर आंबे, पुरंदरचे अंजीर, जळवागचे वांग्याचे भरीत, सोलापूरचे डाळिंब, नागपूरची संत्री, करवत काटी साडी आणि आता कोकणच्या हापुस आंब्यास भौगोलिक मानांकन जाहीर झाले आहे.
No comments:
Post a Comment