Wednesday, 12 December 2018

महाराष्ट्रात ‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी’ 2 कोटींहून अधिक नोंदणी







         

           
नवी दिल्ली, १२ :  प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत  गेल्या दोन वर्षात देशभरातील १० कोटी ९१ लाख ४४ हजार ९८२ शेतक-यांनी नोंदणी केली आहे. देशात सर्वात जास्त महाराष्ट्रातील २ कोटी  २१ लाख ३८ हजार ६०७ शेतक-यांनी  नोंदणी केली आहे.

            शेतक-यांनी कष्टाने पिकविलेल्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीने होणारी नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यावतीने देशभर २०१६ च्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीतील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक शेतक-यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केल्याची माहिती कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने संसदेत सादर केलेल्या माहितीत पुढे आली आहे.
2016-17 मध्ये 1 कोटी 20 लाख नोदंणी
            प्रधानमंत्री पीक विमा योजनेची खरीप हंगाम २०१६ मध्ये सुरुवात झाली यावेळी  राज्यातील १ कोटी ९ लाख ९७ हजार ३९८ शेतक-यांनी नोंदणी केली याच हंगामात देशभरातील  २७ राज्य व केंद्रशासीत प्रदेशातील एकूण ४ कोटी २ लाख ५८ हजार७३७ शेतक-यांनी नोंदणी केली होती.
            २०१६-१७ च्या खरीप हंगामात राज्यातील १० लाख ८ हजार ५३२ शेतक-यांनी नोंदणी केली होती तर याच हंगामात देशातील एकूण १ कोटी ७० लाख ५६ हजार ९१६ शेतक-यांनी नोंदणी केली . महाराष्ट्रात २०१६ खरीप आणि २०१६-१७ च्या रबी हंगामात एकूण १ कोटी २० लाख ५ हजार ९३० शेतक-यांनी नोंदणी केली .
                           
                                                 2017-18 मध्ये 1 कोटी 1 लाख नोदंणी
राज्यात २०१७ खरीप आणि २०१७-१८ च्या रबी हंगामात एकूण १ कोटी १ लाख ३२ हजार ६७७ शेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी केली होती. २०१७ च्या खरीप हंगामात राज्यातील ८७ लाख ६८ हजार २११ शेतक-यांनी नोंदणी केली तर देशभरातील  २७ राज्य व केंद्रशासीत प्रदेशातील एकूण ३ कोटी ४७ लाख ७६ हजार ५५ शेतक-यांनी या हंगामात नोंदणी केली. २०१७-१८ च्या रबी हंगामात राज्यातील १३ लाख ६४ हजार ४६६ शेतक-यांनी नोंदणी केली होती तर याच हंगामात देशातील एकूण १ कोटी ७० लाख ५३ हजार २७४  शेतक-यांनी नोंदणी केली .
                           केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री  पुरुषोत्तम रूपाला यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात प्रधानमंत्री  पीक विमा योजनेसंदर्भात आज संसदेत माहिती दिली आहे.        

    महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.४२०/  दिनांक १२.१२.२०१८ 



No comments:

Post a Comment