Wednesday, 16 January 2019

विधान भवनाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट





















               
                            
नवी दिल्ली, 16 : विधान भवनाचे जनसंपर्क अधिकारी तथा वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या आगामी उपक्रमांबाबत चर्चा झाली.  

            श्री मदाने आणि वि.स. पागे प्रशिक्षण केंद्राचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र संखे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देवून श्री. मदाने आणि श्री. संखे यांचे स्वागत केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार उपस्थित होते.

            श्री. मदाने यांनी यावेळी, विधान  भवन व वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राद्वारे राबविण्यात येत असलेले व आगामी काळात राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहिती दिली. परिचय केंद्राच्या वैविद्यपूर्ण उपक्रमांबाबत माहितीही त्यांनी जाणून घेतली.  शासनातील जनसंपर्क विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा, राज्य शासनाच्या विविध उपक्रमांबाबत समाज माध्यमांद्वारे करण्यात येणारी प्रभावी प्रसिध्दी आणि कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रमांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. देशाच्या राजधानीत महाराष्ट्राच्या प्रतिनिधीत्वाचा झेंडा अभिमानाने उंचावत ठेवण्याचे काम परिचय केंद्राने केल्याच्या भावना श्री. मदाने यांनी मांडल्या.    
      
दिल्लीस्थित विविध राज्यांच्या जनसंपर्क विभागांसोबत संपर्क व समन्वय साधून जनसंपर्क विषयक कार्यातील सकारात्मक उपक्रमांच्या देवाण घेवाणीत या कार्यालयाच्या पुढाकाराबाबत श्री. कांबळे यांनी माहिती दिली. दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, परिचय केंद्राची विविध प्रकाशने आदींची माहिती श्री. कांबळे यांनी यावेळी दिली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन श्री. मदाने यांनी माहिती जाणून घेतली व कार्यालयाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.
                                        
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     
                                                          00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.21/दि.16.01.2019

No comments:

Post a Comment