नवी दिल्ली, 6 : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत महाराष्ट्रात 391 प्रधानमंत्री कौशल्य
विकास प्रशिक्षण केंद्र तर 43 प्रधानमंत्री
कौशल्य केंद्र उभारण्यात आली आहेत.
केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाअंतर्गत
कार्यरत राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्यावतीने देशात महत्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री
कौशल्य विकास योजना 2016-2020’ ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. देशातील प्रत्येक जिल्हयात
या योजनेच्या माध्यमातून आकांक्षी कौशल्य केंद्र चालविण्यात येतात जी प्रधान कौशल्य
केंद्र या नावाने ओळखली जातात. देशातील 1 कोटी तरुणांना अल्प कालावधी प्रशिक्षण् देण्याच्या उद्देशाने या योजनेची अंमलबजावणी सुरु
आहे.
प्रधानमंत्री
कौशल्य विकास योजनेअंतर्गत देशातील 29 राज्य व
7 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 10 हजार 355 प्रधानमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण
केंद्र तर 738 प्रधानमंत्री कौशल्य केंद्र
उभारण्यात आली आहेत. यापैकी महाराष्ट्रात 391 प्रधानमंत्री कौशल विकास प्रशिक्षण केंद्र
तर 43 प्रधानमंत्री कौशल केंद्र उभारण्यात
आली आहेत. अशी माहिती केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राज्यसभेत एका
प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.59/दि.6.02.2019
No comments:
Post a Comment