Tuesday 9 April 2019

राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील 62 शैक्षणिक संस्था



        
विद्यापीठ रँकिंग मध्ये राज्यातील 11 विद्यापीठे 
नवी दिल्ली, दि. 9 : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील शैक्षणिक संस्थांची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग जाहीर केली. देशातील उत्कृष्ट संस्थांमध्ये महाराष्ट्रातील विविध 62 शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.  

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात सोमवारी उच्च शैक्षणिक संस्थांची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग-2019 जाहीर झाली. शिक्षण, शैक्षणिक साधने, संशोधन तसेच  व्यावसायिक पध्दती या मापदंडांवर एकूण 9 श्रेणींमध्ये  सर्वोत्कृष्ट 610 संस्थांची यादी जाहीर करण्यात आली असून यात 8  श्रेणींमध्ये  महाराष्ट्रातील 62 संस्थांचा समावेश आहे.

सर्वोत्कृष्ट समग्र संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या  12 संस्था
संस्थात्मक रँकिंगच्या यादीत समग्र संस्थांच्या श्रेणीमध्ये निवडलेल्या देशातील 100 शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 12 शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 17 व्या स्थानावर आहे. पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेस 23 वे  स्थान मिळाले आहे. इन्स्टिटयूट ऑफ केमीकल टेक्नॉलॉजी -पुणे (27), होमीभाभा नॅशनल इन्स्टिटयूट -मुंबई(30), टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस -मुंबई (56), डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ –पुणे(70), सिंबायोसिस इंटरनॅशनल इन्स्टिटयूट –पुणे (82), एस.व्ही.के.एम नरसी मॉन्जी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज –मुंबई  (83), भारती विद्यापीठ –पुणे(88),  कॉलेज ऑफ इंजिनियरींग -पुणे  (91) आणि वर्धा येथील दत्ता मेघे इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायंसेस 92 व्या क्रमांकावर  आहे. 
विद्यापीठ रँकिंग मध्ये राज्यातील 11 विद्यापीठे
यादीत देशातल्या 100 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील 11 विद्यापीठांचा समावेश आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे विद्यापीठ रँकिंगमध्ये 10 व्या स्थानावर आहे. मुंबई स्थित इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी  या विद्यापीठास 15 वे स्थान मिळाले आहे, तर होमी भाभा नॅशनल इन्स्टिटयूटला 17 वी रँकिंग देण्यात आली आहे.  टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस -मुंबई (35), डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ –पुणे(46), सिंबायोसिस इंटरनॅशनल इन्स्टिटयूट –पुणे (56), एस.व्ही.के.एम नरसी मॉन्जी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज –मुंबई  (57), भारती विद्यापीठ –पुणे(62),  मुंबई विद्यापीठ-मुंबई (81), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ- औरंगाबाद (85) आणि मुंबई येथील पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ  88 व्या क्रमांकावर  आहे.   

                                   राज्यातील 8 अभियांत्रिकी संस्थाना रँकिंग
अभियांत्रिकी शिक्षण संस्थेच्या रँकिंग मध्ये देशातील 100 अभियांत्रिकी संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 8 संस्थांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे ही संस्था तियऱ्या क्रमांकावर तर मुंबई स्थित इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या संस्थेला 11 वे स्थान मिळाले आहे. नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीला 31 वी रँकिंग प्राप्त झाली आहे.कॉलेज ऑफ इंजिनीयरींग –पुणे(49), डिफेंस इन्स्टिटयूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी-पुणे (57), नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजिनीयरींग-मुंबई (66),आर्मी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी –पुणे(91) आणि भारती  विद्यापीठाच्या पुणे स्थित इंजिनीयरींग कॉलेज 93 व्या क्रमांकावर आहे.    
                                 तीन महाविद्यालयांना मिळाली रँकिंग
महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 100 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालय 27 व्या स्थानावर आहे . तर पुण्यातीलच राजीव गांधी इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी 42 व्या आणि मुंबई येथील सेंट झेवीयर्स महाविद्यालय 96 व्या स्थानावर आहे.   
राज्यातील 8 व्यवस्थापन संस्थाना रँकिंग
देशातील 75 उत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 8 संस्थांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे ही संस्था 10 व्या स्थानावर तर मुंबईच्या एस.पी.जैन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च मुंबई 16 व्या स्थानावर आहे तर सिंबायोसीस इस्टिटयूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट-पुणे आणि एस.व्ही.के.एम नरसी मोन्जी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज-मुंबई  या दोन्ही संस्था संयुक्तरित्या 20 व्या स्थानावर आहेत. नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजिनीयरींग -मुंबई(29), के.जे.सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च –मुंबई(54), इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट –पुणे(55)  आणि नागपूर येथील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीला 70 वे स्थान मिळाले आहे.
औषधीय संस्थांमध्ये राज्यातील 18 संस्था
देशातल्या उत्कृष्ट 75 औषधीय संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 18 संस्थांचा समावेश आहे. पहिल्या 10 औषधीय संस्थांमध्ये मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने चौथ्या क्रमांकावर नाव कोरले. एस.व्ही.के.एम नरसी मोन्जी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज-मुंबई  13 व्या स्थानावर तर पुना कॉलेज ऑफ फार्मसी 16 व्या स्थानावर आहे. बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी –मुंबई (24),राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ -नागपूर(29), एसव्हीकेएम डॉ. भानुबेन नानावटी एज्युकेशन ऑफ फार्मसी –मुंबई(30), वाय.बी.चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी –औरंगाबाद  (36),आर.सी.पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मासीटयुकल एज्युकेशन अँड रिसर्च –शिरपूर  (42),डॉ. डी.वाय. पाटील   इन्स्टिटयूट ऑफ फार्मासीटयुकल सायंस अँड रिसर्च –पुणे  (45), भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फार्मसी –नवी मुंबई  (49), भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फार्मसी –कोल्हापूर  (54), श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी -काम्पटी(60),प्रिन्सिपल के.एम. कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी-मुंबई (61), विवेकानंद एज्युकेशन सोयटीचे कॉलेज ऑफ फार्मसी-मुंबई (67), पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ फार्मसी –पुणे(69), एमव्हीपी सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी –नाशिक(70) आणि पी.ई.सोसायटीचे पुणे स्थित मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी 74 व्या स्थानावर आहे.   

 देशातील 15 सर्वोत्कृष्ट विधी महाविद्यालयांमध्ये राज्यातील पुण्याच्या सिबायोसिस विधी माहाविद्यालयाला 7 वे रँकिंग प्राप्त झाले आहे. देशातील 30 सर्वोत्कृष्ट वैद्यकिय महाविद्यालयांमध्ये डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाने 20 वा क्रमांक पटकाविला आहे.  
यासोबतच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शासकीय व खाजगी शैक्षणिक संस्था अशा दोन श्रेणींमध्ये नाविन्यपूर्ण उपलब्धीसाठी अटल रँकिंग जारी केली. यात देशातील 10 शासकीय व 5 खाजगी संस्थांना क्रमावरी देण्यात आली. या रँकिंगमध्ये शासकीय संस्थांच्या श्रेणीत ‘इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे’ दुस-या तर ‘इन्स्टिटयूट ऑफ  केमीकल टेक्नॉलॉजी ,मुंबई’ 6 व्या स्थानावर आहे.    
 
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi       
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.110/  दिनांक ०८.०४.२०१९ 



No comments:

Post a Comment