लोकमतचे राष्ट्रीय संपादक हरिश
गुप्ता यांच्या हस्ते प्रकाशन
नवी दिल्ली,
दि. 4 : महाराष्ट्र परिचय केंद्राने 17 व्या लोकसभा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसंबंधात उपयुक्त माहिती
असलेली ‘लोकसभा पूर्वपिठीका’ प्रकाशित केली आहे. लोकमतचे राष्ट्रीय संपादक हरिश गुप्ता
व लोकमत दिल्लीचे संपादक विकास झाडे यांच्या हस्ते आज या पूर्वपिठीकेचे प्रकाशन करण्यात
आले.
परिचय
केंद्राचे हे महत्वपूर्ण प्रकाशन प्रादेशिक व राष्ट्रीय प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी
व राजकीय विश्लेषकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. आज दैनिक लोकमतच्या कार्यालयात लोकसभा
पूर्वपिठीकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक
दयानंद कांबळे, जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, बिहार सूचना केंद्राचे सहायकसंचालक
लोकेशकुमार झा उपस्थित होते.
या
पूर्वपिठीकेचे निवडक वैशिष्टये
1977 पासून महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे
निकाल या पूर्वपिठीकेत देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील एकूण लोकसभा मतदारसंघ
आणि पुनर्र्चनेनंतर प्रत्येक लोकसभा मतदार संघांमध्ये अंतर्भूत झालेले विधानसभा मतदार
संघ यांची मतदार संख्येसह विस्तृत माहिती देण्यात
आली आहे. विश्लेषणासाठी उपयुक्त ठरेल अशी 16 व्या लोकसभेतील मतदारसंघ निहाय विजेत्या
व उपविजेत्या उमेदवाराला मिळालेली एकूण मते व मतांची टक्केवारी आणि मतदारसंघात झालेल्या मतदानाची एकूण टक्केवारी
देण्यात आली आहे.
समाजमाध्यमातून होणारा अपप्रचार रोखण्यासाठी
केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने प्रथमच नेमण्यात
आलेल्या नियंत्रण समित्या, वृत्तचित्रवाहिनी व वृत्तपत्रांमधील पेडन्यूज रोखण्यासाठी
नेमण्यात आलेल्या समित्या व त्यांची कार्यपध्दती तसेच, निवडणूक
काळातील विविध तक्रारी नोंदविण्यासाठी उचलण्यात
आलेली पाऊले आदींची माहिती देण्यात आली आहे.
भारतीय निवडणूक आयोग, मुख्य राज्य निवडणूक
अधिकारी यांच्या कार्यालयातील महत्वाचे दूरध्वनी क्रमांक, निवडणूक संबंधित अधिका-यांची
जिल्हानिहाय यादी,राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी आणि
पोलीस विभागातील महत्वाचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. या पूर्वपिठीकेच्या उपयोगकर्त्यास
विशेष सुविधा म्हणून 17 व्या लोकसभा निवडणुकीत निवडून येणारे व उपविजेते ठरणारे उमेदवार
व त्यांना मिळालेली मते यांची माहिती नोंदविण्यासाठी पूर्वपिठीकेचे शेवटची पृष्ठे देण्यात
आली आहेत.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.107/ दिनांक
०४.०४.२०१९
No comments:
Post a Comment