नवी
दिल्ली दि. 11 : येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅश्नल सेंटरच्या
उपक्युरेटर पदी शुध्दोदन वानखेडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता
मंत्रालयाच्या डॉ.आंबेडकर फाऊंडेशनअंतर्गत येथील 15, जनपथ रोडवर उभारण्यात आलेल्या
भव्य डॉ. आंबेडकर इंटरनॅश्नल सेंटर च्या उपक्युरेटर
पदी श्री वानखेडे यांची प्रतिनीयुक्तीतत्वावर नेमणूक करण्यात आली आहे.
श्री. वानखेडे हे केंद्रीय आदिवासी
विकास मंत्रालयात 1991 पासून आर्टिस्ट पदावर कार्यरत आहेत. त्यांनी नागपूर येथील शासकीय
चित्रकला महाविद्यालयातून चित्रकलेची पदवी संपादन केली आहे. पुढे मध्यप्रदेशातील नरसिंहपूर जिल्हयातील योहानी येथील
नवोदय विद्यालयात चित्रकला शिक्षक म्हणून ते
कार्यरत होते. आदिवासी विकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला आहे.
श्री. वानखेडे हे विविध निमंत्रण
पत्राचे डिझाईन करतात, वृत्तपत्रांमध्येही त्यांनी विविध कलात्मक कामे केली आहेत. त्यांनी तयार केलेले माजी राष्ट्रपती
के.आर.नारायणन यांच्यावरील ‘मॅनऑफ द मिलेनियम’ हे कॅरीकेचर विशेष गाजले होते. ‘अजिंठा
भित्ती चित्रातील अलंकारिक रेषा’ या विषयांवर त्यांनी लघुशोध प्रबंध सादर केला आहे. दिल्लीस्थित ऑल इंडिया
सिध्दार्थ वेल्फेअर सोसायटीचे सामाजिक सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.112/ दिनांक
११.०४.२०१९
No comments:
Post a Comment