Tuesday, 4 June 2019

उद्योगांचे पुनरुज्जीवन व पुनर्विकास करणार





                    
                       अरविंद सावंत  यांनी स्वीकारला पदभार 

नवी दिल्ली दि. 4 : अरविंद सावंत यांनी आज केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचा  पदभार स्वीकारला. देशातील उद्योग पुनरुज्जीवित व पुनर्विकसित करून बेरोजगारीची समस्या दूर करण्यास प्राथमिकता असेल असा विश्वास श्री सावंत यांनी व्यक्त केला.

             उद्योग भवनात आज श्री सावंत यांनी वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत केंद्रीय अवजड उद्योग विभागाचा पदभार स्वीकारला. विभागाचे सचिव अशाराम सिहाग यांच्यासह उपस्थित अन्य अधिका-यांनी  पुष्पगुच्छ देवून  श्री. सावंत यांचे  स्वागत केले. श्री सावंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,  देशातील उद्योग क्षेत्रात सुधारणांची गरज आहे. या खात्याचा मंत्री म्हणून नवीन संकल्प घेवून उद्योगांना पुढे घेवून जाण्याचा प्रयत्न असेल. देशात शेती व बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी उद्योग विभाग महत्वाची भूमिका पार पाडू शकतो. यासाठी  उद्योगांचे पुनरुज्जीवन करणे, त्यांचा पुनर्विकास करण्यास आपले प्राधान्य राहील असे श्री. सावंत म्हणाले.

   महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :                    http://twitter.com/micnewdelhi                                              
                                             000000 

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.128/  दिनांक  4.06.2019 


No comments:

Post a Comment