Wednesday 17 July 2019

महाराष्ट्रातील 19 जिल्हयात पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा











                         
नवी दिल्ली, 17 :  पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने देशातील एकूण 406 जिल्हयांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातील 19 जिल्हयांमध्ये अशी परवानगी देण्यात आली आहे.
        पेट्रोलियम व नैसर्गीक गॅस मंत्रालयाअंतर्गत कार्यरत पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळ हे देशातील विविध जिल्हयात पाईपद्वारे नैसर्गीक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना परवानगी देते. या मंडळाने 10 व्या लिलाव फेरी पर्यंत महाराष्ट्रातील 19 जिल्हयांसह देशातील एकूण 406 जिल्हयांमध्ये भौगोलिक क्षेत्रांना परवानगी दिली आहे.
            महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, रायगड ,पुणे ,रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, बृह्नमुंबई, पुणे शहरासह  पिंपरी चिंचवड आणि लगतचे हिंजेवाडी, चाकण, तळेगाव क्षेत्र, अहमदनगर, औरंगाबाद, लातूर , उस्मानाबाद, सांगली, सातारा,सिंधुदुर्ग, धुळे आणि नाशिक या जिल्हांमध्ये पाईपद्वारे नैसर्गीक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना परवानगी देण्यात आली आहे.  
 पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली .
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
0000
रितेश भुयार,/ वृत्त वि. क्र.१५९ / दिनांक  १७.०७.२०१९ 



No comments:

Post a Comment