Wednesday, 14 August 2019

महाराष्ट्रातील तीन तुरुंग अधिकारी-कर्मचा-यांना सेवा पदक




नवी दिल्ली, 14 : देशातील 40 तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील तीन अधिका-यांचा  यात समावेश आहे.

स्वांतत्र्य दिनानिमित्त आज केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणा-या सुधारात्मक सेवा पदकांस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. तुरूंगसेवेत कैद्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या उपक्रमाबद्दल सेवा पदक प्रदान करण्यात येतात. प्रतिष्ठित सेवेसाठी देशातील तीन तुरुंग अधिका-यांची  निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातून सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे सुभेदार शकील शेख यांना हे मानाचे सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले आहे.
याशिवाय,  देशातील 37 तुरुंग अधिकारी -कर्मचा-यांना  उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील दोघा कर्मचा-यांना समावेश आहे. बायखळा जिल्हा कारागृहाचे सिपाई जितेंद्र काटे आणि कल्याण जिल्हा कारागृहाचे सिपाई अशोक ठाकूर यांना उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा .   http://twitter.com/MahaGovtMic                                    
000000
रितेश भुयार  /वृत्त वि. क्र.188/  दिनांक  14.08.2019





No comments:

Post a Comment