नवी दिल्ली, 30
: महाराष्ट्र
सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज ‘भ्रष्टाचार निर्मुलना’ची शपथ घेण्यात आली.
‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर
या कालावधी दरम्यान करण्यात आले असून यातंर्गत ‘भ्रष्टाचार
निर्मुलना’ची शपथ घेऊन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र
सदनातील सभागृहात
आयोजित कार्यक्रमात निवासी
आयुक्त समीर सहाय यांनी
उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना
सत्यनिष्ठा राखण्याची प्रतिज्ञा दिली. यावेळी सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा,
विजय कायरकर यांच्यासह अन्य अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘भ्रष्टाचार निर्मुलना’ची
शपथ
महाराष्ट्र परिचय केंद्रातही ‘भ्रष्टाचार निर्मुलना’ची
शपथ घेण्यात आली. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर
अरोरा यांनी उपस्थित सर्व
अधिकारी आणि कर्मचारी यांना सत्यनिष्ठा राखण्याची प्रतिज्ञा दिली. यावेळी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित
होते.
No comments:
Post a Comment