Saturday, 2 November 2019

महाराष्ट्र सदनात ‘दक्षता जनजागृती सप्ताह’साजरा




                                                                                                       

नवी दिल्ली, 30 :  महाराष्ट्र सदनात  28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2019 या कालावधी दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताहा चे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमाचा प्रारंभ 30 ऑक्टोबर रोजी भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेऊन करण्यात आला. निवासी आयुक्त समीर सहाय यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचा-यांना भ्रष्टाचार निमूर्लनाची शपथ दिली.

या सप्ताहच्या निमित्ताने महाराष्ट्र सदनात वेग-वेगळे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुस-या दिवशी ईमानदारी-एक जीवनशैली या विषयावर निबंध स्पर्धेचा आयोजन करण्यात आला. यात, सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राच्या बहुसंख्य कर्मचा-यांनी आपला सहभाग नोंदविला. तीस-या दिवशी, सर्वांसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर दोन लघुपट सादर करण्यात आले होते.

आज रोजी, निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले. ईमानदारी-एक जीवनशैली  या विषयावर उत्कृष्ठ लेख लिहिणा-या विजेत्यांना, निवासी आयुक्त यांच्या हस्ते  ‍रोख बक्षीस देण्यात आले.  सदनात तैनात असलेले महाराष्ट्र सुरक्षा बलाचे योगेश   शिंदे,- प्रथम क्रमांक , परमेश्वर  जावळे - व्दितीय  तर  प्रदीप धनगर यांनी तृत्तीय क्रमांक पटकविला. यावेळी सहायक निवासी आयुक्त  ‍विजय कायरकर, महाराष्ट्र सुरक्षा बलचे सहायक सुरक्षा अधिकारी, पी.आर.सुरवसे  उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदनच्या व्यवस्थापक श्रीमती भागवंती मेश्राम यांनी केले. 

No comments:

Post a Comment