Wednesday, 13 November 2019

भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात ‘महाराष्ट्रातील व्यवसाय सुलभता ’










                
                         उद्या होणार महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन
नवी दिल्ली, 13 : भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासाठी महाराष्ट्र दालन सज्ज झाले आहे. व्यवसाय सुलभता”(इज ऑफ डुईंग बिजनेस) या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या मेळ्यात महाराष्ट्राने यंदा "महाराष्ट्रातील व्यवसाय सुलभता" साकारली आहे. महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते उद्या १४ नोव्हेंबरला या मेळ्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन होणार आहे.
                प्रगती मैदान येथे दि.14 ते 27 नोव्हेंबर 2019  या कालावधीत वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशनच्यावतीने 39 व्या ‘भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्यावतीने "व्यवसाय सुलभतेच्या माध्यामातून राज्याच्या उद्योग क्षेत्रातील प्रगतीचे दर्शन घडविणारे सुरेख प्रदर्शन साकारण्यात आले आहे.
             राज्य शासनाच्या विविध विभागांचे ८ आणि बचतगटांचे २ असे एकूण १० स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले आहेत. ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’ च्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राची भरारी यंदा राज्याच्यावतीने  प्रदर्शीत करण्यात  आली आहे. 
                महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बी.वेणुगोपाल रेड्डी यांच्या उपस्थितीत 14 नोव्हेंबर 2019   रोजी दुपारी 3 वाजता प्रगती मैदान येथील ‘हॉल क्रमांक 12 -अ’ मध्ये  होणार आहे.
  
                                    २० नोव्हेंबर रोजी साजरा होणार ‘महाराष्ट्र दिन’ 
            व्यापार उद्येागासह या मेळाव्यात सहभागी विविध देश आणि राज्यांच्यावतीने आपली सांस्कृतिक परंपरा दर्शविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जातो. याअंतर्गत २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रगती मैदान येथील ‘हंसध्वनी रंगमंच’ येथे ‘महाराष्ट्र दिन’ साजरा होणार आहे. मुंबई येथील पृथ्वी इनोव्हेशन्स गृपचे कलाकार हा कार्यक्रम सादर करणार असून या माध्यमातून व्यापार मेळयास भेट देणा-या देश-विदेशातील उद्योजक व ग्राहकांना महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण संस्कृतिचे दर्शन होणार आहे.               
       महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                              http://twitter.com/micnewdelhi 
                                          000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.२४ /  दिनांक  १३.११.२०१९ 



No comments:

Post a Comment