Wednesday, 6 November 2019

सोशल मिडियाच्या प्रभावी वापरासाठी महाराष्ट्र परिचय केंद्राला ‘प्रभासाक्षी’ पुरस्कार












नवी दिल्ली, दि.6 : लोकसभा निवडणूक काळात महाराष्ट्र परिचय केंद्राने सोशल मिडीयाच्यामाध्यमातून  दिलेल्या प्रभावी व योग्य अपडेट्सची  दखल देशातील आघाडीचे  हिंदी न्युज पोर्टल ‘प्रभासाक्षी’ ने घेतली असून 8 नोव्हेंबर 2019 ला प्रभासाक्षीच्या वर्धापनदिन कार्यक्रमात परिचय केंद्राला सन्मानित करण्यात येणार आहे.

            ‘प्रभासाक्षी’ पोर्टलद्वारे समाजमाध्यमांचा प्रभावी व योग्य वापर करणा-या  देशातील संस्थांचा दरवर्षी सन्मान करण्यात येतो. यावर्षी  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी (भाजपा) या राजकीय पक्षांसह महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिल्ली स्थित महाराष्ट्र परिचय केंद्राची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. 8 नाव्हेंबर रोजी येथील कॉन्स्टीटयूशन क्लब मध्ये  प्रभासाक्षीच्या 18 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

            यावर्षी देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कालावधित प्रभासाक्षीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले . यात दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या कार्यालयांच्या समाजमाध्यमांद्वारे देण्यात येणा-या अपडेटचेही सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात योग्य व प्रभावीरित्या समाज माध्यमांद्वारे अपडेट्स देण्यात महाराष्ट्र परिचय केंद्राने बाजी मारली आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील अधिकृत(प्रमाणीत) ट्विटर हँडल असणारे महाराष्ट्र परिचय केंद्र हे राजधानीत एकमेव कार्यालय असून फक्त याच कार्यालयाने लोकसभा निवडणूक कालावधित राज्यातील लोकसभा मतदारसंघ निहाय अचूक व प्रभावी माहितीचे अपडेट दिले आहे. ट्विटरद्वारे 1952 पासून ते 2014 पर्यंत राज्यातील लोकसभा निवडणुकीची वैविद्यपूर्ण आकडेवारी देण्यात आली तसेच याकालावधितील संबंधित अपडेट वृत्तही देण्यात आले. त्यासाठी इन्फोग्राफीक्स , व्हिडीयो आदिंचा प्रभावी वापर करण्यात आला.

                सोशल मिडीयाच्या माध्यमातून देशातील तीन हजारांहून अधिक पत्रकार जोडले     

              महाराष्ट्र परिचय केंद्राच्या तिनही  ट्विटर हँडलहून दररोज महत्वाच्या माहितीचे अपडेट्रस देण्यात येत असून देशातील तीन हजारांहून अधिक पत्रकार कार्यालयाच्या सोशल मिडीयाशी जोडले गेले आहेत. ट्विटर सोबतच कार्यालयाचे फेसबुकपेजेस(तीन), ब्लॉग, युटयूब चॅनेल, वॉटस्अपग्रुप आणि एसएमएस सेवेच्या माध्यमातून प्रसार माध्यम आणि जनतेला वेळोवेळी माहिती देण्यात येते.समाजमाध्यमांद्वारे अचूक, योग्य व वेगवान माहिती देण्यात महाराष्ट्र परिचय केंद्राने आघाडी  घेतली असून यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक श्री. ब्रिजेशसिंह यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
              वैविद्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क विभागाची पताका राजधानी दिल्लीत मानाने उंचविण्याचे काम करणारे महाराष्ट्र परिचय केंद्र हे आधुनिक युगाची पावले ओळखून समाजमाध्यमांचा प्रभावी  व योग्य वापर करीत आहे. ‘प्रभासाक्षी’ या आघाडीच्या न्युज पोर्टलने परिचय केंद्राच्या समाजमाध्यमांद्वारे केल्या जाणा-या जनसंपर्काची घेतलेली दखल कार्यालयाच्या कार्याचा विशेष बहुमान आहे.

            येत्या 8 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी 4 वाजता येथील कॉन्स्टीटयूशन क्लबच्या डेप्युटी स्पीकरहॉलमध्ये प्रभासाक्षीच्या 18 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र परिचय केंद्राला सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यालयाचे उपसंचालक दयानंद कांबळे पुरस्कार स्वीकारणार आहेत. ‘हिंदी और क्षेत्रीय भाषाओं की डिजीटल मीडिया पर बढती भूमिका’ विषयावर यावेळी परिसंवाद होणार आहे.  
                                                            ******
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा         http://twiter.com/MahaGovtMic
                                                          http://twitter.com/MahaMicHindi
                                                       http://twitter.com/micnewdelhi

                                                    

रितेश भुयार/वृ.वि.क्र. 243 / दि.06.11.2019


No comments:

Post a Comment