Saturday 25 January 2020

सैन्य दलातील 7 मराठी सैन्य अधिकारी आणि जवांनाना सेना मेडल जाहीर




नवी दिल्ली, दि. 25 : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने आज सैन्य दलातील अदम्य साहसासाठी सेवा मेडल जाहीर केले आहेत. यामध्ये 7 मराठी सैन्य अधिकारी आणि जवांनाचा समावेश आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने आज शौर्य आणि विशिष्ट सेवा पुरस्कार जाहीर केले आहेत. या पुरस्कारामध्ये परम विशिष्ट सेवा मेडल, उत्तम युध्द सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल, शौर्य चक्र, बार सेना मेडल(शौर्य), सेना मेडल(शौर्य), बार सेना मेडल (विशिष्ट), सेना मेडल (विशिष्ट) विशिष्ट सेवा मेडल जाहीर केले आहेत. यासोबतच ऑपरेशन रेनो, ऑपरेशन रक्षक ही विशेष मोहिम यशस्वी करणा-या जवांनानाही विशेष जाहीर झाले आहेत.
सेना मेडल(विशिष्ट) साठी, असम लष्करी तुकडीतील मेजर मोहित खरे, नायक दिलीप पोळ यांची नावे जाहीर झाले आहेत.
विशिष्ठ सेवा मेडल पुरस्कारसाठी मराठा लष्करी तुकडीतील ब्रिगेडीयर प्रवीण शिंदे (निवृत्त), कर्नल धर्नुजीवन ज्योती रानडे आणि लेफ्टन्न कर्नल हर्षवर्धन सत्रे या सैन्य अधिका-यांची नावे जाहीर झालेली आहेत.

‘ऑपरेशन रक्षक’साठी मराठा तुकडीतील 2 मराठी जवान होणार सन्मानित

सैन्यदलातर्फे वर्षभरात राबविलेल्या विविध सैन्य मोहिमांमध्ये अदम्य साहास दाखविणा-या सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये ‘ऑपरेशन रक्षक’ या विशेष मोहिमेमध्ये मराठा तुकडीतील सुभेदार मच्छीद्रनाथ गोविंद पाटील आणि सुभेदार संभाजी गोविंद भोगन या 2 मराठी जवानांचा सहभाग होता. यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.


आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
अंजू निमसरक/वृत विशेष क्र. 19 दि.25.01.2020

No comments:

Post a Comment