नवी दिल्ली, दि. 25 : रेल्वेची सुरक्षा करणा-या रेल्वे पोलीस दलातील उल्लेखनीय कामगीरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलिस पदक केंद्रीय रेल्वेमंत्रालयाने आज जाहिर केले आहेत. देशातील 18 रेल्वे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहिर झाले असून यामध्ये कोकण रेल्वेतील दोघांचा समावेश आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वेमंत्रालयाने रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे सुरक्षा विशेष दलासाठी आज राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर केली आहेत. विशिष्ठ सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदक दिले जाणार आहेत.
उत्कृष्ट सेवेसाठी रेल्वेतील 15 पोलीस अधिका-यांना पोलीस पदके जाहिर झाली आहेत. राष्ट्रपती पोलीस पदक विशिष्ठ सेवेसाठी 2 रेल्वे पोलीस अधिका-यांची नावे जाहिर झाली आहेत. तर पोलीस पदकासाठी 1 पोलीस कर्मचा-याचे नाव जाहिर झाले आहे.
कोकण रेल्वेतील दोन अधिका-यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस पदक जाहीर झाली आहेत. यामध्ये सहायक सुरक्षा आयुक्त पी.पी जॉय आणि उपनिरीक्षक देवकुमार गौंड यांचा समावेश आहे.
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
अंजू निमसरकर/वृत विशेष क्र. 20 दि.25.01.2020
No comments:
Post a Comment