नवी दिल्ली, 6 :
'चंदनाचे परिमळ
आम्हा काय त्याचे..'
या अवीट रचनेसह विविध रागांतील बंदिशी व तराणे यांचे
गायक सुनील कुलकर्णी यांनी केलेल्या उत्तम सादरीकरणाने आज दिल्लीकर सुखावून गेले. निमित्त
होते दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित वसंतोत्सवाचे.
दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्यावतीने महाराष्ट्रातील खासदार महोदयांचा परिचय दिल्लीतील
रहिवाशी मराठी बांधव व मराठी संस्थांशी व्हावा या उद्देशाने कोपर्निकस मार्ग स्थित
महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर ‘वंसतोत्सव’ संगीत संध्येचे आयोजन करण्यात आले.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह खासदार सर्वश्री अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई,
श्रीनिवास पाटील,कुमार केतकर,हुसेन दलवाई, गिरीष बापट,
गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, रामदास तडस, अशोक नेते,
उन्मेश पाटील, डॉ. सुभाष भामरे, डॉ.नरेंद्र जाधव,डॉ.भरती पवार,सुनील मेंढे, संजय मंडलीक, हेंमत पाटील हिना गावीत, ओम
राजेनिबांळकर, संभाजी छत्रपती यावेळी उपस्थित होते.
यावेळी, गायक तथा केंद्रीयमंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांचे स्वीय सहायक
सुनिल कुलकर्णी यांनी शास्त्रीय व उपशास्त्रीय
गायनाची प्रस्तुती दिली. मैफलीची सुरुवात गौड मल्हार रागातील 'बरखा बहार आयी ....'
या बंदिश गायनाने झाली. शाम कल्याण रागातील 'चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे' या रचनेने उपस्थितांच्या टाळ्या मिळवली. 'राम राम मुकुंद जयजय'
हे भजन , बहार वसंत रागातील ' सावरे सलोने ...' या बंदिश व तरण्यालाही उपस्थितांची उत्तम दाद मिळाली. 'डारो न डारो मोपे रंग .. '
या भैरवी रागातील
बंदिशीने या संगीत मैफलीची सांगता झाली.
महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त शामलाल गोयल, दिल्ली मराठी प्रतिष्ठानसह दिल्लीतील विविध मराठी संस्थाचे पदाधिकारी , दिल्ली स्थित विविध क्षेत्रातत कार्यरत मराठी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
00000
रितेश भुयार /वि.वृ.क्र. 27 /दि.6.02.2020
No comments:
Post a Comment