नवी दिल्ली, 13 : राष्ट्रीय
अंधत्व व दृष्टीबाधितता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यात गेल्या चार वर्षात 27 हजार
889 नेत्रदान झाले असून आतापर्यंत 74 नेत्रदान केंद्र स्थापित झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने
राज्य शासनांच्या समन्वयातून देशभर ‘राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीबाधितता नियंत्रण कार्यक्रम’
राबविण्यात येतो. वर्ष 2016-2017 ते 2019-20 आर्थिकवर्षानुसार देशातील 36 राज्य व केंद्रशासीत
प्रदेशांमध्ये आतापर्यंत 2 लाख 64 हजार 695 नेत्रदान झाले आहेत.
राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीबाधितता
नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात गेल्या चार वर्षात 27 हजार 889 नेत्रदान झाले
आहे. राज्यात वर्ष 2016-17 मध्ये निर्धारीत 7 हजार नेत्रदानाच्या तुलनेत जास्त
म्हणजे 7 हजार 514 जणांनी नेत्रदान केले. वर्ष 2017-18 मध्ये निर्धारीत 7 हजार नेत्रदानाच्या
तुलनेत 7 हजार 560 तर वर्ष 2018-19 मध्ये निर्धारीत
7 हजार नेत्रदानाच्या तुलनेत 7 हजार 323 दात्यांनी नेत्रदान केले. वर्ष 2019-20 या
चालू आर्थिक वर्षात निर्धारीत 7 हजार 500 च्या तुलनेत आतापर्यंत 5 हजार 492 नेत्रदान
झाले आहे. तसेच, गेल्या चार वर्षात देशात एकूण 380 नेत्रदान केंद्र उभारण्यात आले असून
महाराष्ट्रात 74 नेत्रदान
केंद्र उभारण्यात आले आहेत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनीकुमार चौबे
यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर
हॅण्डलला फॉलो करा :
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.56/दिनांक १३.०३.२०२०
No comments:
Post a Comment