Tuesday, 3 March 2020

डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची ‘बीबीसी मराठी’ व ‘उत्तर प्रदेश माहिती केंद्राला’ भेट















    
                
नवी दिल्ली, 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज बीबीसी मराठी आणि उत्तर प्रदेश माहिती केंद्राला भेट देवून त्यांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली.

          डॉ. पाढरपट्टे यांनी आज येथील कॅनॉटप्लेस भागात स्थित बीबीसी मराठीच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी ब्रॉडकास्ट जर्नालिस्ट अभिजी कांबळे यांनी त्यांचे स्वागत केले परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित बीबीसी मराठीच्या प्रतिनिधींनी या माध्यम संस्थेच्या कार्याविषयी  माहिती दिली. या माध्यम संस्थेत 'नव माध्यम' आणि 'डिजीटल माध्यमांचा' उपयोग करून होत असलेल्या कामाची वैशिष्टयपूर्ण माहितीही डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी जाणून घेतली.

            जनपथ येथील चंद्रलोक बिल्डींगमध्ये स्थित उत्तर प्रदेश शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत कार्यरत उत्तर प्रदेश माहिती केंद्रालाही डॉ. पांढरपट्टे यांनी आज सदिच्छा भेट दिली. माहिती केंद्राचे संचालक दिनेशकुमार गुप्ता यांनी डॉ. पांढरपट्टे यांचे स्वागत केले. कार्यालयाच्यावतीने करण्यात येणारे प्रसिध्दी व जनसंपर्क कार्य तसेच राबविण्यात येणारे विविध उपक्रम आदींची माहिती श्री. गुप्ता यांनी यावेळी दिली. माहिती केंद्राची विविध प्रकाशनेही त्यांनी यावेळी डॉ. पांढरपट्टे यांना भेट स्वरूपात दिली. 

          महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                                                            000000 

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.48/  दिनांक 3.03.2020 


No comments:

Post a Comment