नवी दिल्ली, 06 : केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक
गॅस व पोलाद मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज पर्यावरणपुरक कॉम्प्रेस्ड नॅचरल
गॅस (सीएनजी) ची व्यापकता वाढविण्याच्या उद्देशाने देशभर 42 सीएनजी आणि टोरेंट
गॅसचे 3 सिटी गेट स्टेशन्सचे लोकार्पण करण्यात आले. यापैकी 8 महाराष्ट्रामध्ये आहेत.
केंद्रीय मंत्री श्री प्रधान यांनी आज आयोजित
कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सींगव्दारे
सर्व 42 सीएनजी आणि 3 सिटी गेट स्टेशन्स जोडली.
या कार्यक्रमात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि देशभरातील वितरक ज्यांना सीएनजी
आणि सिटी गॅस स्टेशन प्राप्त झालेली आहेत ते उपस्थित होते.
आज जोडलेल्या 42 सीएनजी स्टेशन्समध्ये 14
उत्तरप्रदेश, 8 महाराष्ट्र, 6 गुजरात, 4 पंजाब आणि 5-5 तेंलगाना आणि राजस्थान येथे
आहेत. सात राज्य, 1 केंद्र शासित प्रदेशातील एकूण 32 जिल्ह्यांमध्ये टोरेंट गॅसला
सिटी गॅस वितरण नेटवर्क पसरविण्याचे अधिकार आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र,
उत्तर प्रदेश आणि पंजाब मध्ये एक-एक सिटी स्टेशन आहे.
No comments:
Post a Comment