Wednesday, 6 January 2021

महाराष्ट्र परिचय केंद्रात पत्रकार दिन साजरा

 

                




   
     




नवी दिल्ली ,    : महाराष्ट्र परिचय केंद्रात आज मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

 

        उपसंचालक दयानंद कांबळे यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक  आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  माहिती अधिकारी  अंजू निमसरकर-कांबळे , उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनी  जांभेकरांच्या   प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

 

यावेळी बोलताना श्री. कांबळे यांनी मराठी पत्रकारितेच्या आरंभापासून ते आतापर्यंतच्या विविध स्थित्यंतराबाबत प्रकाश टाकला.

 

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी   जानेवारी १८३२ रोजी  दर्पण हे मराठी भाषेतील पहीले वृत्तपत्र काढून मराठी वृत्तपत्रांचा पाया रचला. पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करून दर्पणच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजात नवी जीवनमुल्ये रूजविण्यात मोलाचे योगदान दिले. बाळशास्त्री जांभेकरांच्या या योगदानासाठी त्यांचा जन्मदिन मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.       

                               

No comments:

Post a Comment