Monday, 25 January 2021

महाराष्ट्रातील तीन तुरुंग कर्मचा-यांना सुधारात्मक सेवा पदक



 

नवी दिल्ली, 25 : देशातील 52 तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे.

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणा-या सुधारात्मक सेवा पदकांस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज मंजुरी दिली आहे. तुरूंगसेवेत कैद्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या उपक्रमाबद्दल  सुधारात्मक सेवा पदक प्रदान करण्यात येतात.

 देशातील 12 तुरुंग अधिका-यांची ‘राष्ट्रपती सुधारात्मक सेवा पदकासाठी निवड करण्यात आली तसेच 39 तुरुंग अधिकारी -कर्मचा-यांना  उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे , यात महाराष्ट्रातील तिघांचा  समावेश आहे. हवालदार सर्वश्री उत्तम विश्वनाथ गावडे, संतोष बबला मंचेकर आणि बबन नामदेव खंदारे यांना उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले.

            एका कर्मचा-याला मरणोत्तर सुधारात्मक शौर्य सेवा पदक जाहीर झाले आहे.  


 

No comments:

Post a Comment