नवी दिल्ली ,दि. 23
: क्रातिकारी संत व थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र सदन
आणि महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी
करण्यात आली.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील
सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर
मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन
केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह
महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थितांनी यावेळी संत गाडगे
महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात संत गाडगे महाराजांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प
अर्पण करून आदरांजली वाहीली. यावेळी माजी सहसचिव चंद्रकांत
जाधव आणि विधीमंडळाचे माजी जनसंपर्क अधिकारी विठ्ठल जाधव यांच्यासह उपस्थित कार्यालयातील अधिकारी-कर्मचा-यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला
पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर
हॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/micnewdelhi
000000
रितेश भुयार
/वृत्त वि. क्र.33/ दिनांक
23.02.2021
No comments:
Post a Comment