नवी दिल्ली, १२ : महाराष्ट्र
राज्याचे पहिले मुख्यमंत्री, माजी उप पंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची जयंती
आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्गस्थित
महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त निधी
पांडे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ.
राजेश अडपावार यांच्यासह
महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी
यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय
केंद्रात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात
यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद
कांबळे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी उपस्थित अधिकारी- कर्मचा-यांनी यशवंतराव
चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय
केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
000000




No comments:
Post a Comment