नवी दिल्ली दि. 1 मे : ज्येष्ठ विचारवंत, लेखक, नाटककार, समीक्षक व तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक डॉ सदानंद मोरे हे उद्या 2 मे रोजी महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रवास या विषयावर 40 वे पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला 1 मे रोजी 61 वर्ष पूर्ण होत आहेत आणि नवी दिल्लीतील महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेचे हे हीरक महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने परिचय केंद्राने 19 मार्च 2021 पासून “महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला” सुरु केली आहे. या व्याख्यानमालेत महाराष्ट्र दिनी म्हणजे 2 मे रोजी सायंकाळी 7 वाजता ज्येष्ठ विचारवंत डॉ सदानंद मोरे हे आपले विचार मांडणार आहेत.
डॉ सदानंद मोरे यांच्याविषयी..
लेखक, कवी , नाटककार, समीक्षक, इतिहास
संशोधक, प्रवचनकार, कीर्तनकार म्हणून ओळख
एम. ए.
(प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास )
‘द गीता – अ थिअरी
ऑफ ह्युमन एक्शन ‘ या विषयावर पी. एच. डी. चे
संशोधन
सर्वोत्कृष्ट
प्रबंधासाठी गुरुदेव दामले पुरस्कार
विद्यापीठीय
अनुदान मंडळाकडून मिळालेल्या ‘करिअर अवार्ड ‘ अंतर्गत ‘कृष्ण :
द मॅन अँड हिज मिशन ‘ या
विषयावर पोस्ट डॉक्टरल संशोधन .
पेशाने
विद्यापीठीय व्याख्याते .पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत विविध अध्यासनांचे समन्वयक
प्राध्यापक म्हणून बरीच वर्ष कार्यरत .
संतश्रेष्ठ
तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक वारसा बहुविद्या शाखीय
व्यासंगाने अधिक समृध्द करणारे विचारवंत म्हणून मान्यता .
अनेक
संत साहित्य विषयक तसेच सामाजिक ग्रंथांचे
लेखन , संपादन .
विविध चर्चासत्रे , परिसंवाद , कार्यशाळेतून अनेक शोधनिबंधांचे वाचन ,व्याख्याने .
तुकाराम
दर्शन या ग्रंथासाठी साहित्य अकादमीसह 15 संस्थांचे
पुरस्कार .उजळल्या दिशा या नाटकासाठी राज्य शासनासह 10
संस्थांचे पुरस्कार.
साहित्य संस्कृती मंडळापासून साहित्य अकादमी पर्यंत अनेक साहित्यिक – सांस्कृतिक संघटनांशी दीर्घकाळचे विविध स्तरीय संबंध .
समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण
रविवार दि 2 मे 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राच्या खालील लिंक वर थेट प्रसारित होईल.
थेट
प्रसारण येथे पहा
ट्विटर
https://twitter.com/MahaGovtMic
https://twitter.com/micnewdelhi
https://twitter.com/MahaMicHindi
यू
ट्यूब
https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi
https://facebook.com/micnewdelhi
कू(Koo)
https://www.kooapp.com/profile/micdelhi
*******************
No comments:
Post a Comment