नवी
दिल्ली दि. 9 मे : चित्रपट
सृष्टिवरील अभ्यासक डॉ. कविता गगरानी या
उद्या दिनांक 10 मे रोजी महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत महाराष्ट्राच्या 'चित्रपट
सृष्टीला कोल्हापूरचे योगदान' या विषयावर 43 वे पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला 1 मे रोजी 61 वर्ष पूर्ण होत
आहेत आणि नवी दिल्लीतील महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र परिचय केंद्राच्या
स्थापनेचे हे हीरक महोत्सवी वर्ष आहे . या निमित्ताने परिचय केंद्राने 19 मार्च
2021 पासून “महाराष्ट्र
हीरक महोत्सव व्याख्यानमाला” सुरु केली आहे . या व्याख्यानमालेत 10
मे रोजी सायंकाळी 7 वाजता चित्रपट अभ्यासक, संशोधक डॉ. कविता
गगरानी आपले विचार मांडणार आहेत.
डॉ. कविता गगरानी यांच्याविषयी
डॉ. कविता गगरानी या कोल्हापुरातील द न्यू कॉलेज येथे इतिहास
या विषयाच्या सहायक प्राध्यापक आहेत.
त्यांचा पीएचडी चा विषय कोल्हापुरातील चित्रपट सृष्टी : ऐतिहासिक
अभ्यासक्रम,असा होता.
श्रीमती गगरानी या
पुर्वी शिवाजी विद्यापीठात इतिहास विभागात
संशोधन अधिकारी म्हणुन कार्यरत होत्या.
श्रीमती गगरानी यांनी वेगवेगळ्या विषयावर जवळपास 100 लेख लिहिले आहेत. तसेच
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषद, सेमिनारमधे
त्यांची 50 रिसर्च पेपर प्रकाशित झालेली आहेत.
श्रीमती गगरानी या
कॉलेज, संस्था, कार्यालय, रेडियोमधे
बरेच टॉक शो करतात. रॉबिन हुड आर्मीमधे रॉबिन म्हणुन काम पहातात. भालजी पेंढारकर
कला अकादमीत सल्लगार म्हणुन आहेत. आतापर्यंत त्यांनी 11 युरोपीयन देशात भ्रमन्ती
केली आहे.
समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण
सोमवार दि. 10 मे 2021 रोजी सायंकाळी 7
वाजता महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि
युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा
लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राच्या खालील लिंक
वर थेट प्रसारित होईल.
थेट प्रसारण येथे पहा
ट्विटर
https://twitter.com/MahaGovtMic
https://twitter.com/micnewdelhi
https://twitter.com/MahaMicHindi
यू
ट्यूब
https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi
फेसबुक
https://facebook.com/micnewdelhi
कू (Koo)
https://www.kooapp.com/profile/micdelhi
*******
No comments:
Post a Comment