नवी दिल्ली, दि. 12 : महाराष्ट्र
हे पुरोगामी राज्य आहे आणि पुरोगामीत्वाची मशाल कायम तेवत ठेवणार असल्याचे मत,
ज्येष्ठ पत्रकार राजू परूळेकर यांनी आज मांडले.
महाराष्ट्र परिचय
केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ‘पुरोगामी महाराष्ट्राचे भविष्य’ विषयावर 56 वे पुष्प गुंफताना श्री परूळेकर बोलत होते.
भारतात एकच अस राज्य आहे ज्यात ‘राष्ट्र’ असा उल्लेख आहे. ते
म्हणजे ‘महाराष्ट्र’ अशा या महाराष्ट्रामध्ये पुरोगामीत्वाची सुरवात होऊन
हे पुरोगामीत्व टिकविण्याची सशक्तता असल्याचे श्री परुळेकर म्हणाले. आपल्या
मातृभाषेचा, राज्याचा, येथील सत्यशोधक परंपरेचा आदर अभिमान असणे आवश्यकच आहे. कारण
महाराष्ट्राच्या मातीचे तसे संस्कारच आहेत. याचा दूराभिमान होता कामा नये. कारण
आपल्या पूर्वसुरींना ज्यामध्ये छत्रपती
शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले,
महात्माफुले, शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब
आंबेडकर, केशवराव जेधे, भाई बागल, नाना पाटील, यशवंतराव चव्हाण आणि अनेक समाज
सुधारकांनी घडविलेल्या महाराष्ट्राचे आपण वारस आहोत, त्यांच्या नावाला आणि त्यांनी
दिलेल्या संस्काराला गालबोट लावले जाणार नाही याची काळजी घेणे आपले कर्तव्यच आहे.
महाराष्ट्राला लाभलेली ही
पुरोगामीत्वाची साखळी मजबूत ठेवणे आणि सतत तेवत ठेवणे सर्वांचे कर्तव्य आहे तसे
बहुसंख्य महाराष्ट्रातील जनतेला वाटत असल्याचे
श्री राजू परूळेकर म्हणाले. सोबतच ते पुढे म्हणाले, ज्यांना कुणाला शंका
असेल त्यांच्या शंका दूर करण्याची जबाबदारी आपण निभाऊ जे उदात्त, उन्नत असे विचार
सर्वापर्यंत पोहोचविण्याचा पर्यंत आपण सर्वांकडून होत राहील, अशी आशा त्यांनी
व्यक्त केली.
पुरोगामीत्व म्हणजे स्वातंत्र्य, समता, कोणत्याही मागासलेल्या विचारांना
प्राधान्य न देणे, आधुनिकतेकडे वाटचाल करणे, सत्यशोधकतेकडे प्रवास करणे या सगळया
गोष्टी राज्याने आपल्या धोरणात अवलंबविण्याचे ठरविले तर ते राज्य पुरोगामी व्हायला
मदत होते. हे सर्व महाराष्ट्रात मागील 60 वर्षात घडत गेल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात महिलांना समता आणि समान संधी
देण्यासाठी राज्य शासनाने महिला धोरण जाहीर केले. यामागे इतिहासाची पार्श्वभूमी
आहे, माहिलांच्या मोठया साामाजिक चळवळी राज्यात झाल्या. महाराष्ट्राला सावित्रीबाई फुले, महत्मा फुले,
राजर्षी शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या कृतीशील असणा-या
महापुरूषांची आणि लोकोत्तर माणसांची उणीव कधीच भासली नाही. त्यामुळे पुरोगामीपण
महाराष्ट्राच्या लोकांमध्ये भीनत गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या पायावर पुढच्या काळात महाराष्ट्रातील समाजसुधारक,
विचारवंत समोर घेऊन गेल्याचे श्री परुळेकर म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक चळवळ उभी राहीली.
यामध्ये केशवराव जेधे, नाना पाटील, भाई बागल यासर्वांनी बहुजन समाजाला स्वत:च्या हक्काबाबत जागृत केले. स्त्री-पुरूष समतेचे तत्व पुढे नेण्याचे काम या समाजसुधारकांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा राज्यघटना तयारी केली त्यावेळी त्या मागची
पृष्ठभूमी महाराष्ट्रामध्ये तयार होती. त्यामुळेच महाराष्ट्रला पुरोगामी राज्य
म्हणूनही ओळखले जाते असेही श्री परूळेकर
यावेळी म्हणाले.
संयुक्त महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातील लोकांनी
लोकशाही मार्गाने केलेले आंदोलन, त्यासाठी डावे, उजवे, मध्यमार्गी या सर्व
विचारांच्या लोकांनी एकत्रितपणे दिलेला पाठींबा हे सर्व महाराष्ट्रातील पुरोगामी
पार्श्वभूमीमुळेच शक्य झाल्याचेही श्री परूळेकर यांनी यावेळी सांगितले.
बरेचदा परिस्थितीमुळे असे वाटत गेले की,
महाराष्ट्र हा प्रतीगामी होतो की काय, मात्र आपली पुरोगामीत्वाची पाळेमुळे इतकी
सशक्त आहेत की तसे होण शक्य नसल्याचे ते श्री परूळेकर यांनी निरक्षणातून नोंदविले.
सावित्रीबाई फुले, हामीद दलवाई यांच्या कार्याला आलेले अनेक अडथळे त्यांनी दूर करत
महाराष्ट्राच्या विकासाची पायाभरणी केली. सत्यशोधक, चित्कित्सकबुध्दी सोडली नाही.
हे महाराष्ट्राचे यश असल्याचे, श्री परूळेकर म्हणाले.
प्रत्येक काळात पुरोगामी, प्रतिगामी
विचारसरणीची एक लाट येत असते. असे जगभर होत असते. असे सांगून श्री परूळेकर पुढे
म्हणाले, संघराज्य भारतात महाराष्ट्र राज्य एक भाग आहे. जे काही देशपातळीवर होत
असते त्याचे प्रतिसाद राज्यवर उमटत असतात. महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाची पाळेमुळे
इतकी सशक्त आहेत की येथे हिंसाचार, असमानता, अविवेकी विचारांना लोकशाही मार्गाने
विरोध करण्याचे पूर्ण सामर्थ्य आहे. महाराष्ट्रातील जनतेचे समाजमन कोणत्याही
प्रतीगामी हल्ल्यांना समोर जाण्यासाठी सक्षम असल्याचे ही श्री परूळेकर म्हणाले.
महाराष्ट्राच्या भविष्याविषयी बोलताना श्री परूळेकर म्हणाले,
सावत्रीबाईंनी अंत्यत विरोधाभासी परिस्थितीमध्ये काम केले. त्यांनी जे रोपटे लावले
होते आता त्याचा वटवृक्ष झालेला आहे. स्त्री आपल्या पायांवर उभी आहे. स्त्रीयांमध्ये
चार प्रकार मोडतात. एक ग्रामीण काम करणारी स्त्री, दुसरी ग्रामीण घरकाम करणारी
स्त्री, शहरीभागतील घरात काम करणारी,
शहरीभागातील बाहेर जाऊन काम करणारी स्त्री, आर्थिकरित्या कमवत्या असल्या,
किंवा सत्तेत प्रतिनिधीत्व मिळाले की स्त्रीया स्वतंत्र मिळते अस होत नसल्याचे
सांगुन त्यांची व्यक्ती म्हणून असणारी
स्वतंत्र ओळख जपणे महत्वाचे असल्याचे श्री परूळेकर म्हणाले. हीच बाब अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीसाठी तसेच
समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी लागु असल्याचे श्री परूळेकर म्हणाले. श्रीमंत असो
वा गरीब प्रत्येक व्यक्तीला एकच मत
देण्याचा अधिकार आहे त्याच प्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा व्यक्ती म्हणून आदर, सन्मान
आणि असणारी स्वतंत्र ओळख जपली गेली पाहिजे. ही जबाबदारी बहुसंख्या लोकांची जास्त असते, जसे पुरूषांनी स्त्रीयांची
स्वतंत्र व्यक्ती म्हणुन ओळख जपली पाहिजे, तसेच सर्वच स्तरातील बहुसंख्यकांनी
प्रत्येकाची स्वतंत्र ओळख जोपासली पाहिजे. ही स्वतंत्र ओळख जपण्याची परंपरा
महाराष्ट्राने राखली आहे हे ही पुरोगामीत्वाचे लक्षण असल्याचे श्री परूळेकर
म्हणाले.
सध्याची तरूण पिढी आपला इतिहास जाणून
घेण्यात उत्सुक दिसत नसल्याचे निरीक्षण श्री परूळेकर यांनी नोंदवून पुढे म्हणाले,
महाराष्ट्रातील तरूणांनी आपली सामाजिक, वैचारिकतेची असणारी परंपरा जाणून घेतली
पाहिजे यासाठी वाचन वाढविले पाहिजे. यासोबतच ते म्हणाले, सामाजशास्त्रात सर्वकालिक
सत्य अस काहीच नसते. त्यामुळे प्रत्येकांची बाजू ऐकूण घेणे ती समजून घेणे गरजेचे
असल्याचे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment