नवी दिल्ली, दि. ९ : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत प्रसिध्द कवी आणि गीतकार दासू वैद्य हे मंगळवार, १० ऑगस्ट २०२१ रोजी ‘भाषा आणि आपण’ या विषयावर ५४ वे पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु आहे. व्याख्यानमालेत १० ऑगस्ट रोजी दासू वैद्य हे दुपारी ४ वाजता आपले विचार मांडणार आहेत.
दासू वैद्य यांच्या विषयी
दासू
वैद्य यांनी कवितांसोबतच, नभोनाटय, एकांकिका, बालसाहित्य आणि चित्रपट गीतलेखन या
प्रांतात विपुल लेखन केले आहे.
श्री.
वैद्य, १९८७ पासून मराठीतील वाड्मयीन
नियतकालिकांमधून सातत्याने कविता लेखन करीत आहेत. ‘तूर्तास’ हा त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला व या संग्रहास अनेक मानाचे पुरस्कारही प्राप्त
झाले आहेत. ‘तत्पूर्वी’ हा त्यांचा
कविता संग्रही प्रसिध्द आहे. ‘चौघांच्या कविता’ या कार्यक्रमाचे त्यांनी महाराष्ट्रभर सादरीकरण केले आहे.
त्यांनी बालसाहित्यातही मोलाचे योगदान दिले आहे. ‘भुर्रर्र’या त्यांच्या बालकथा संग्रहास महाराष्ट्र बालसभा (कोल्हापूर) चा पुरस्कार पुरस्कार मिळाला आहे. ‘क कवितेचा’ हा बालकविता संग्रह, लेखक व ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे यांच्या ‘आसवं गाळती कासवं’ या बालकादंबरीचे त्यांनी नाटयरुपांतर करून व्यावसायिक प्रयोग केले आहेत. महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती मंडळाने इयत्ता ६वीच्या सुगम भारती क्रमिक पाठयपुस्तकात ‘पक्ष्यांना घर हवे’ या बालनाटयाचा समावेश केला आहे. त्यांच्या अनेक कवितांचा ,कविता संग्रहाचा व एकांकिकेचा पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे.
दासू वैद्य यांनी आजवर अनेक चित्रपट, जाहिरातपट व मालिकांसाठी लेखन केलेले आहे. ‘बिनधास्त’ या मराठी चित्रपटातील गीतलेखनासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा कै.ग.दि.माडगूळकर उत्कृष्ट गीतलेखन पुरस्कार मिळाला आहे. ‘भेट’,‘सावरखेड एक गांव’, ‘गाभ्रीचा पाऊस’, ‘खाली डोकं वरती पाय’, ‘तुकाराम’ या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे. पिंपळपान, टिकल ते पॉलिटिकल , एक होता राजा, आपली माणसं इत्यादी मालिकांसाठी त्यांनी पटकथा तसेच शीर्षकगीत लेखन केले आहे. लेक वाचवा अभियानासाठीही त्यांनी अभियानगीत लिहिलेले आहे. बेळगाव जिल्हयातील (कर्नाटक) कुद्रेमनी येथे पार पडलेल्या पाचव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
मंगळवारी समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण
मंगळवार, १० ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारित होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी
ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता
येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक
मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi युटयूब चॅनेल वर पाहता येणार
आहे.
आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा : https://twitter.com/MahaGovtMic
००००
वृत्त वि. क्र.१६८ /दिनांक ९.०८.२०२१
No comments:
Post a Comment