Thursday, 14 October 2021

‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त दूरदर्शनचे उपसंचालक नितीन सप्रे यांचे उद्बोधन



नवी दिल्ली, 14 : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्‍या जयंती निमित्त महाराष्ट्र परिचय केंद्राच्‍यावतीने आयोजित कार्यक्रमात दूरदर्शन केंद्राचे (नवी दिल्ली) उपसंचालक नितीन सप्रे हे ‘वाचन प्रेरणा दिन’ आणि डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या विषयी अनुभव कथन करणार आहेत.

माजी राष्ट्रपती स्व. डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम याच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्यावतीने 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. याचेच औचित्य साधत परिचय केंद्राच्यावतीने 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित कार्यक्रमात नितीन सप्रे हे ‘वाचन प्रेरणा दिन’ आणि डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या विषयीचे अनुभव कथन करणार आहेत. कार्यालयाच्या समाज माध्यमांहून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी
याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
समाज माध्यमांहून थेट प्रसारण

शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल आणि फेसबुकहून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण होणार आहे.

हे व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic,
हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि ‍
इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI ,
फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि
फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share वर पाहता येणार आहे.
००००
वि.वृ.क्र.211 /दि.14.10.2021

 

No comments:

Post a Comment