नवी
दिल्ली, २५
: राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांचा शेतमाल आणि वनउपज प्रत्यक्ष रिटेल
चेनद्वारे अंतिम वापरकर्त्याला विकण्याच्या उद्देशाने अभ्यास करण्यासाठी विधानसभेचे
उपाध्यक्ष श्री नरहरी झिरवाळ यांनी आज
दिल्ली स्थित 'मदर
डेयरी' च्या
सफल या फळ व भाजीपाला प्रक्रिया केंद्राला भेट दिली.
श्री. झिरवाळ यांनी येथील मंगोलपुरी औद्योगिकक्षेत्रात स्थित सफल फळ व भाजीपाला प्रक्रिया केंद्राला भेट दिली. राज्यातील आदिवासी शेतकरी विविध प्रकारची फळे व भाजीपाला यांचे उत्पादन घेतात. या शेतकऱ्यांच्या मालाला उचित दर व बाजारपेठ मिळावी तसेच गुणवत्तापूर्ण शेतमाल उत्पादनासाठी त्यांनी मदर डेयरीचे उपव्यवस्थापकीय संचालक डॉ.ओमविर सिंह यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. सफलकडून शेतकऱ्यांना करण्यात येणारे मार्गदर्शन आदिंविषयांचीही माहिती घेतली. नाचणीपासून ते स्ट्रॉबेरी, द्राक्षे आदि वैविद्यपूर्ण पीक घेणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांचा माल रिटेल चेनद्वारे उपभोक्त्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सफलकडून भविष्यात सहकार्य मिळण्याची अपेक्षाही श्री झिरवाळ यांनी यावेळी व्यक्त केली.
श्री. झिरवाळ यांनी येथील २२ एकर परिसरात वसलेल्या सफल केंद्राची पाहणी केली. त्यांनी या केंद्रातील मध्यवर्ती वितरण सुविधा (सीडीएफ) समजून घेतली. येथील वाटाणा प्रक्रिया विभाग, वाटाणा पॅकेजिंग विभाग, शीतगृह, फळ पिकवणी विभाग, डिस्पॅच विभाग तसेच या केंद्राच्या परिसरातील सफल आऊटलेटलाही भेट दिली व याबाबतची यंत्रणा सविस्तररित्या जाणून घेतली.
डॉ.ओमविर सिंह यांनी यावेळी सादरीकरण केले. सफल केंद्राच्यावतीने शेतकऱ्यांच्या मालाला देण्यात येणारा उचित दर व ग्राहकांना रास्त दरात उपलब्ध करून देण्यात येणारा गुणवत्तापूर्ण माल आदिंबाबत सविस्तर माहिती दिली.
मंगोलपुरी स्थित सफलचे बिजनेस हेड विनोद कुमार, युनिट हेड अशोक कुमार, फार्मर डेव्हलपमेंट विभाग प्रमुख डॉ विनीत कथुरिया यांच्यासह श्री झिरवाळ यांचे खाजगी सचिव मुकेश भोग, विशेष कार्य अधिकारी सर्वश्री राजू नंदकर आणि अजित कसरळीकर उपस्थित हेाते.
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
00000
रितेश भुयार /
वि.वृ.क्र.२१७ /दि.
२५.१०.2021
No comments:
Post a Comment