Monday, 1 November 2021

केंद्रीय क्रीडा मंत्री यांच्या हस्ते वर्ष 2020 चे राष्ट्रीय क्रीडा आणि साहसी पुरस्कार प्रत्यक्षपणे प्रदान

 




 

महाराष्ट्रातील 11 खेळाडू आणि 3 संस्थांचा समावेश

 

नवी दिल्ली , 1 :  केंद्रीय युवा कल्याण तथा  क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांच्या हस्ते वर्ष 2020 चे राष्ट्रीय क्रीडा आणि साहसी पुरस्कार प्रत्यक्षपणे प्रदान करून खेळाडूंना गौरविण्यात आले.

 

            केंद्रीय क्रीडा मंत्रालयातंर्गत येणा-या स्पोर्ट्स ऑथरिटी ऑफ इंडियाच्यावतीने अशोका हॉटेल येथे एका शानदार कार्यक्रमात प्रत्यक्षपणे राष्ट्रीय क्रीडा आणि साहसी पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले. मागच्यावर्षी 29 ऑगस्ट 2020 रोजी राष्ट्रपतींच्‍या हस्ते पुरस्कार आभासी पद्धतीने प्रदान करण्यात आले होते. आज प्रत्यक्षपणे केंद्रीय युवा कल्याण तथा क्रीडा  मंत्री श्री ठाकुर यांच्याहस्ते खेळाडुंना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी एकूण 54 खेळाडूंना आणि 6 संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित  करण्यात आले . यामध्ये महाराष्ट्रातील 11 खेळाडू आणि 3 संस्थांचा समावेश आहे.

 

महाराष्ट्रातील 11 खेळाडू आणि 3 संस्था सन्मानित

पॉवरलिफ्टिर विजय मुनश्विर यांना त्यांच्या संपुर्ण कारर्कीदीसाठी द्रोणाचार्य श्रेणीतील जीवनगौरव पुस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्रातील 6 खेळाडुंना अर्जुन पुरस्कार प्रदान

वर्ष 2020 मध्ये महाराष्ट्रातील 6 खेळाडुंना अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला होता आणि आभासी माध्यमाने प्रदानही करण्यात आला होता. आज प्रत्यक्षपणे या खेळाडुंचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. यामध्ये   रोवींग या क्रीडा प्रकारासाठी दत्तु बबन भोकनल, कुस्तीगीर  राहुल आवारे यांना कुस्तीसाठी, जलतरणपटू सुयश नारायण जाधव यांना जलतरणसाठी, चिराग शेट्टी यांना बॅडमिंटन या क्रीडा प्रकारासाठी, सारीका सुधाकर काले यांना खो-खो खेळासाठी मधुरीका सुहास पाटकर यांना टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

बँडमिंटन या क्रीडा प्रकारासाठी प्रदीप गंधे आणि टेबल टेनिस कोच म्हणुन नंदन पी बाळ यांना   ध्यानचंद राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्ष 2019 च्या तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कारासाठी केवल कक्का यांना सन्मानित करण्यात आले.   

क्रीडा क्षेत्रातील पायाभुत सोयी-सुविधा उपलब्ध करून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रतील 3 संस्थांची निवड करण्यात आली होती. यामध्ये आर्मी स्पोर्टस इंस्टीटयूट, पुणे, लक्ष्य इंस्टीटयूट, पुणे, आंतरराष्ट्रीय इंस्टीटयूट ऑफ स्पोर्टस मॅनेजमेंट, मुंबई यांचा समावेश आहे. आज या संस्थांना प्रत्यक्ष पुरस्कार देऊन गौरव‍िण्यात आले.    

  

No comments:

Post a Comment