Monday, 15 November 2021

उलगुलानकार बिरसा मुंडा महान स्वातंत्र्य सैनिक : जेष्ठ साहित्यिक लक्ष्मीकमल गेडाम

 







   



नवी दिल्ली, 15 : उलगुलानकार बिरसा मुंडा हे महान स्वातंत्र्य सैनिक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकमल गेडाम यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमात केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात बिरसा मुंडा यांची 146 वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित जेष्ठ साहित्यिक लक्ष्मीकमल गेडाम यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण केले. माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह उपस्थित कर्मचारी वर्गानेही  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

लक्ष्मी कमल गेडाम पुढे म्हणाल्या, उलगुलानकार अशी उपाधी बिरसा मुंडा यांना देण्यात आली होती. उलगुलान याचा अथ सर्वांनी एकाच वेळी एकसंध होऊन लढलेली न्यायाची व्यापक लढाई होय. उलगुलाचा उद्घोष बिरसा मुंडा यांनी आदिवासी सामाजात केला असल्यामुळे त्यांना उलगुलानकार असे म्हणत   असल्याचे श्रीमती गेडाम यांनी यावेळी सांगितले. बिरसा मुंडा यांच्यात उपजतच नेतृत्व कौशल्य तसेच अन्य कलागुण होते. ते आदिवासी समाजात अत्यंत आदणीय होते, त्यामुळे त्यांना धरती आबा असेही म्हणत असल्याचे श्रीमती गेडाम यांनी याप्रसंगी सांगितले. जगंलातील, जमीन, वनस्पती, खाद्यसामुग्री, खनिज सपंदा ही आदिवासींची आहे यासाठी ते लढले.  वयाच्या 25 व्या वर्षीच बिरसा मुंडा यांनी आपल्या मायभुमीसाठी आपले सर्वस्व अर्पण केले असल्याचे श्रीमती गेडाम यांनी सांगितले.  

श्रीमती गेडाम यांनी यावेळी त्यांचे स्वलिख‍ित आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा, झुंबरझुले आणि अखिल भारतीय गाव संमेलन या तीन पुस्तका परिचय केंद्राच्या ग्रंथालयाला भेट दिल्या.

 

महाराष्ट्र सदनात बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अपर मुख्य सचिव तथा निवासी आयुक्त श्यामलाल गोयल यांनी बिरसा मुंडा  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी, सहायक निवासी आयुक्त डॉ. निरूमपा डांगे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश डपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

No comments:

Post a Comment