Tuesday, 25 January 2022

महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिका-यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर

नवी दिल्ली, दि. 5 : अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगीरीसाठी महाराष्ट्राला दोन राष्ट्रपती सेवा पदकांसह एकूण सात अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहेत.

           प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधत केंद्रीय गृह मंत्रालयाने आज उल्लेखनीय सेवेसाठी देशातील अग्निशमन सेवेच्या एकूण४२ अधिकारी -कर्मचाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये अग्निशम सेवा पदक जाहीर केली आहेत. या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील सातअग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

बाळू देशमुख यांना मरणोत्तर राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक

अग्निशमन रक्षक बाळू देशमुख यांना सर्वोच्च शौर्यासाठी मराणोत्तर राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर झाले आहे. तर मुख्य अग्निशमन  अधिकारी  प्रशांत रणपिसे यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर झाले आहे.

                    राज्याला पाच अग्निशमन सेवा पदक

उत्कृष्ट सेवेसाठी  राज्यातील पाच अधिकारी कर्मचाऱ्यांना अग्निशमन सेवा पदक जाहीर झाले आहेत.यात मुख्य अग्निशमन अधिकारी  किरण गावडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर,अग्रणी अग्निशमक सुरेश पाटील आणि संजय म्हमूनकर तसेच  अग्निशमक चंद्रकांत आनंददास यांचा समावेश आहे.

देशभरातील अग्निशमन अधिकारी कर्मचाऱ्यांना जाहीर झालेल्या अग्निशमन सेवा पदकांमध्ये १ राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक, शौर्यासाठी २ अग्निशमन सेवा पदक, विशिष्ट सेवेसाठी ९ राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदकआणि  उत्कृष्ट सेवेसाठी  ३० अग्निशमन सेवा पदक जाहीर झाले आहेत.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

                                              00000

रितेश भुयार/वि.वृ.क्र.3 /दि. 25.01.202

  महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिका-यांना अग्निशमन सेवा पदक जाहीर

No comments:

Post a Comment