नवी दिल्ली, ७ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण
संस्थेचे (बार्टी) महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली.
परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ. का.)अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री. गजभिये यांचे स्वागत केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्यावतीने प्रकाशित ‘महामुंबईचा विकास’ ही पुस्तिकाही गजभिये यांना भेट स्वरुपात देण्यात आली. माहिती अधिकारी अंजू निमसरकर आणि उपसंपादक रितेश भुयार यावेळी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्र आणि बार्टीच्या कार्याविषयी अनौपचारिक चर्चा झाली.
यावेळी श्रीमती अरोरा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे प्रकाशित करण्यात येणारी प्रकाशने, प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय, कार्यालयाच्या सोशल मिडीयाहून देण्यात येणारी माहिती, दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांशी साधण्यात येणारा समन्वयाबाबत माहिती दिली. तसेच, परिचय केंद्राच्यातवीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही दिली. श्री. गजभिये यांनी परिचय केंद्राच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
श्री. गजभिये यांनी महाराष्ट्र शासनाच्या
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था म्हणून बार्टीद्वारे
करण्यात येणाऱ्या वैविद्यपूर्ण कार्याविषयी माहिती दिली. या संस्थेद्वारे चालणारे
संशोधन व प्रशिक्षण कार्य, सामाजिक समता विषयक चालणारे संशोधन कार्य, बार्टीच्यावतीने आयोजित करण्यात
येणारे सम्मेलने, व्याख्यान,चर्चासत्र ,परिसंवाद आदिंविषयीही त्यांनी माहिती दिली. या संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात
येणारी पुस्तके, नियतकालिके आणि
संशोधनात्मक निबंध आदिंबाबतही त्यांनी माहिती दिली.
00000
आम्हाला ट्विटर वर फॉलो
करा http://twitter.com/MahaGovtMic
वि.वृ.क्र.
४६ /दि.७.०३.२०२२
No comments:
Post a Comment