दिल्ली, दि.22 : 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये “गोष्ट एका पैठणीची" (पैठणीवर कथा) या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. “टकटक” आणि “सुमी” या मराठी चित्रपटातील बाल कलाकारांना उत्कृष्ट बाल कलाकारांचा पुरस्कार जाहिर, तर, “तानाजी : द अनसंग वॉरिअर” या हिंदी चित्रपटाला सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन श्रेणीतील पुरस्कार जाहिर झाला असून याच चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अजय देवगन यांना घोषित झाला आहे.
येथील नॅशनल मिडीया सेंटर मध्ये आयोजित
पत्रकार परिषदेत आज वर्ष 2020 साठीच्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची
घोषणा आज करण्यात आली. यामध्ये विविध श्रेणीत मराठी चित्रपटांनी बाजी मारली
आहे.
'गोष्ट एका पैठणीची' हा ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
प्लानेट मराठीतर्फे निर्मित “गोष्ट एका पैठणीची” या चित्रपटाचे दिग्दर्शन शांतनू गणेश रोडे यांनी केले आहे. या चित्रपटाला एक लाख रुपयाचा रजत कमल पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
“तानाजी : द अनसंग वॉरिअर” या हिंदी चित्रपटाला
सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन श्रेणीतील पुरस्कार जाहिर झाला आहे. या चित्रपटाची
निर्मिती अजय देवगण फिल्मस् आणि दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. या दोघांनाही
सुवर्ण कमळ आणि दोन लाख रूपये रोखीचा पुरस्कार जाहिर झाला आहे. अजय देवगन आणि
तामिळ अभिनेता सुर्या (चित्रपट - सोराराई पोट्टरू) यांना संयुक्तरित्या उत्कृष्ट
अभिनेत्याचा पुरस्कार जाहिर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप रजत कमळ आणि पन्नास हजार
रुपये असे आहे. तानाजी या चित्रपटाला उत्कृष्ट वेशभुषेसाठीही पुरस्कार जाहिर झाला
असून वेशभुषाकार नचिकेत बर्वे आणि महेश र्शेला यांना रजत कमळ आणि पन्नास हजाररूपये
असा पुरस्कार जाहीर झाला आहे.
महिला व बालकांच्या सक्षमीकरणावर आधारित तसेच अनिष्ट चालीरीतींवर बोट ठेवणारा “फनरल” या मराठी चित्रपटाला सामाजिक विषयावरील श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते बीफोर-आफटर इंटरटेंमेंट व दिग्दर्शक विवेक दुबे यांना एक लाख पन्नास हजार रुपयांचा रजत कमल हा पुरस्कार जाहिर झाला आहे.
“टकटक” आणि “सुमी” या मराठी
चित्रपटातील बाल कलाकारांना
उत्कृष्ट बाल कलाकारांचा पुरस्कार जाहिर
“टकटक” आणि “सुमी” या मराठी चित्रपटातील बाल कलाकारांना उत्कृष्ट बाल कलाकारांचा पुरस्कार जाहिर झाला आहे. “सुमी” या सिनेमातील आकांक्षा पिंगळे आणि दिव्येश इंदुलकर या बालकांना आणि “टकटक” या सिनेमासाठी अनिष मंगेश गोसावी यांनारजत कमळ पुरस्कार जाहिर झाला आहे.
“सुमी”
या चित्रपटाला उत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार जाहिर झाला आहे. या चित्रपटाची
निर्मिती हर्षला कामत इंटरटेंमेंट यांनी केली आहे, तर दिग्दर्शक अमोल गोळे यांनी
केले आहे. या चित्रपटाला सुवर्ण कमळ आणि
प्रत्येकी एक लाख पन्नास हजार रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
'जून', 'गोदाकाठ' आणि 'अवांछित' या तीनही चित्रपटांना विशेष ज्युरी मेंशन पुरस्कार जाहिर झालेला आहे. जून चित्रपटासाठी सिद्धार्थ मेनन या अभिनेत्याला तर गोदाकाठ व अवांछित या दोन्ही चित्रपटांसाठी अभिनेते किशोर कदम यांना प्रमाणपत्र जाहिर झाले आहे.
“मी वसंतराव” या मराठी चित्रपटातील शास्त्रीय पार्श्वगायनासाठी राहूल देशपांडे यांना रजत कमळ पुरस्कार जाहिर झालेला आहे. तसेच या चित्रपटाला उत्कृष्ट ऑडिओग्राफीचा पुरस्कारही जाहिर झालेला आहे. या चित्रपटाचे साऊंड डिझायनर अनमोल भावे यांना रजत कमळ आणि पंन्नास हजार रोख पुरस्कार जाहिर झाला आहे.
हिंदी सिनेमा “सायना”तील गीतासाठी गीतकार मनोज मुंतशिर यांना रजत कमळचा पुरस्कार जाहिर झालेला आहे.
नॉन फिचर फिल्म या श्रेणीत मराठी “कुमकुमचरण चित्रपटाला पुरस्कार जाहिर
कौटुंबिक मुल्यांवर आधारित “कुमकुमचरण
(देवींचीपुजा अर्चना)” या मराठी चित्रपटाला उत्कृष्ट कौटुंबिक मुल्यांचा
पुरस्कार जाहिर झाला आहे. या चित्रपटाचे निर्मिती
स्टुडिओ फिल्मी माँक्स आणि दिग्दर्शक अभिजित दळवी यांनी केली आहे. या
दोघांनाही प्रत्येकी पन्नास हजार रूपयांचा रजत कमळ पुरस्कार जाहिर झाला आहे.
00000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
No comments:
Post a Comment