नवी दिल्ली, 20 : दक्षिण फ्रांस येथील मार्सिलिस बंदरावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक उभारण्यात यावे, असे
निवेदन विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह
यांच्या कडे केली.
येथील नार्थ
ब्लॉकमध्ये केंद्रीय श्री. शाह यांची भेट घेऊन दक्षिण फ्रांस येथील मार्सिलिस
बंदरावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक उभारण्यात यावे, या संदर्भात चर्चा केली असल्याची, माहिती भेटीनंतर,
श्री नार्वेकरांनी दिली.
श्री
नार्वेकर यांनी सांगितले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी
ब्रिटीशांच्या ताब्यातून सुटका करून देशाच्या स्वातंत्र्य लढा सुरू ठेवण्यासाठी
दक्षिण फ्रांसच्या मार्सेलिस बंदरामध्ये बोटीतून उडी घेतली होती. या ऐतिहासिक
घटनेला यावर्षी 112 वर्ष पूर्ण होत आहेत. इतिहासामध्ये या
घटनेला अनन्यसाधारण महत्व आहे. या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक असावे,
अशी भारतीयांची अपेक्षा आहे. या स्मारकाच्या संकल्पनेबाबत
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांचा ही पाठिंबा असल्याची माहिती श्री नार्वेकर यांनी यावेळी दिली.
याविषयावर
परराष्ट्र व्यवहार मंत्री यांची भेट घेतली असल्याचे श्री नार्वेकर यांनी सांगितले.
तसेच,
यासंदर्भात राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून योग्य समन्वय आणि
सहकार्य व्हावे, यासाठी आजची बैठक होती. यासंदर्भात पुढील
दिशा ठरविली जाईल, अशीही माहिती श्री नार्वेकर यांनी दिली.
000000
No comments:
Post a Comment