नवी दिल्ली, 9 : रामायण महाकाव्याचे रचनाकार महर्षि वाल्मिकी
यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात
सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी
महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी
निवासी अभियंता (स्थापत्य) जे.पी.गंगवार,सहायक निवासी आयुक्त (अ.का.)
निलेश केदारे यांच्यासह महाराष्ट्र सदन व
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली
वाहिली.
महाराष्ट्र
परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
000000
वृत्त वि. क्र. १६० / दिनांक ९.१०.2022


No comments:
Post a Comment