नवी दिल्ली, 22 : मराठी साहित्याची परंपरा मोठी
असून यामध्ये दिवाळी अंक मराठी भाषेच लेणं
ठरले आहे. याचा सुगंध राजधानीपर्यंत पोहोचविण्याचे
कार्य परिचय केंद्राच्या माध्यमातून केल जात असल्याचे गौरव उदगार कादंबरीकार विश्वास
पाटील यांनी आज येथे काढले.
महाराष्ट्र परिचय केंद्रातील ग्रंथालयात
आज ‘दिवाळी अंक प्रदर्शना’चे उद्घाटन सिद्धहस्त कादंबरीकार विश्वास
पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जनसंपर्क
अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री पाटील यांचे स्वागत शाल,
रोपटे आणि दिवाळी विशेषांकाचा संच भेट देऊन केले. यावेळी
माहिती अधिकारी अंजु निमसरकर-कांबळे, ग्रंथपाल रामेश्वर बरडे तसेच परिचय केंद्राचे
कर्मचारी यांच्यासह कॅनडा राजदुत कार्यालयाच्या वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी तथा
लेखिका अर्चना मिरजकर उपस्थित होत्या.
ते
पुढे म्हणाले, मराठी वाचक चोखंदळ असून तो अस्सल,
दर्जेदार वाचन साहित्याला मान देतो. या वाचनाला दिवाळी विशेषांकांची जोड हा
वाचकांसाठी तसेच लेखकांसाठी विशेष देणे आहे. दिवाळी विशेषांक हा कैवल्याचा आनंद देत
असून यामाध्यमातून लेखक, चित्रकार, पत्रकार घडत असतात. दिवाळी विशेषांकांची परंपरा
ही दुर्गा पूजा निमित्त बंगाल मध्ये सुरू झाली. ती मराठी लेखकांनी दिवाळी निमित्त
शंभर- सव्वाशे वर्षापूर्वी सुरू केली. आज
ही परंपरा मराठी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग
बनून अधिक वृद्धींगत होत असल्याच्या भावना श्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या.
परिचय
केंद्र दिवाळी अंकांचे विशेष प्रदर्शन राजधानी दिल्लीत आयोजित करीत असल्यामुळे येथील
मराठी वाचकांसाठी, पत्रकारांसाठी, संसद सदस्यांसाठी ही एका अर्थाने पर्वणी ठरत
असल्याचे श्री पाटील म्हणाले.
विश्वास
पाटील हे सिद्धहस्त कादंबरीकार असून ते भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी होते.
त्यांच्या जवळपास सर्वच कादंब-या गाजलेल्या आहेत. पानीपत, झाडाझडती, संभाजी, महानायक
आदि अशा सरस, वाचनप्रिय ऐतिहासिक तसेच सामाजिक भान असणा-या कादंब-यांचे लेखन
त्यांनी केलेले आहे. त्यांच्या कादंब-या अनेक भाषेत अनुवादित झालेल्या आहेत. झाडाझडती
या कांदबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. आजच्या कार्यक्रमात त्यांनी
पानीपत कादंबरी लिहीतांना दिल्ली, हरीयाणा आणि आसपासच्या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक
खाणाखूण्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
श्री
पाटील लिखीत ‘शिवाजी
महासम्राट कांदबरी’चा पहिला खंड इंग्रजीमध्ये वेस्टलँड प्रकाशनाने मंगळवारी प्रकाशित केला.
आजपासून दिवाळी अंक प्रदर्शन
वाचकांसाठी खुले महाराष्ट्र
परिचय केंद्राच्या दिवाळी अंक प्रदर्शनात विविध विषयांवरील नामांकीत प्रकाशकांसह
नवोदित प्रकाशकांचीही 90 च्या वर दिवाळी
अंक मांडण्यात आलेले आहेत. यामध्ये थिंक पॉझिटिव्ह, महाराष्ट्राची जत्रा, किशोर, कालनिर्णय, दिवाळी
आवाज, मिळून सा-याजणी, तारांगण, माहेर, मार्मिक, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता,
सामना, लोकप्रभा, मिडिया वॉच, लोकमत दिपोत्सव, चपराक, उत्तम अनुवाद, गोंदण, शब्दगांधार,
प्रतिबिंब, कथाश्री, अनघा, किल्ला, अक्षरभेट, अलका, ऋतुरंग असे एकापेक्षा एक सरस
वाचनीय दिवाळी अंक परिचय केंद्रात वाचकांसाठी उपलब्ध आहेत. हे
प्रदर्शन आजपासून ग्रंथालय सदस्यांसाठी खुले आहे. हे प्रदर्शन पुढील काही दिवस सुरू राहील. |
No comments:
Post a Comment