नवी दिल्ली, 5: जी 20 च्या सर्वपक्षीय बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज येथे उपस्थित होते.
येथील राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक सहभागृहात आज परिषदेसंदर्भात सूचना, चर्चा आणि धोरण ठरविण्याबाबत नवी दिल्ली येथे सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीची अध्यक्षता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. यावेळी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, वित्त मंत्री निर्मला सितारमण, पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव उपस्थित होते. विविध पक्ष प्रमुख उपस्थित होते या बैठकीस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते.
30 नोव्हेंबर 2023 पर्यंत जी 20 चे अध्यक्षपद भारताला मिळाले आहे. या अंतर्गत देशातील विविध राज्यांमध्ये वर्षभर जी-20 च्या बैठका होतील. यातील 14 बैठका मुंबई, पुणे, नागपूर औरंगाबाद याठीकाणी होणार आहेत.
राज्यात आतापर्यंत जी-20 च्या संदर्भात झालेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला असून, मुख्यमंत्री श्री शिंदे नी राज्यात या संदर्भात सुरू असलेल्या कामांबाबत माहिती दिली.
000000
No comments:
Post a Comment