Friday 2 December 2022

मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मागास समाजाचा सर्वांगीण विकासाचा प्रयत्न राहणार : हंसराज अहीर



 

 

हंसराज अहीर यांनी आज केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षाचा पदभार स्वीकारला

 

नवी दिल्ली ,02 : मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मागास समाजाच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न साधण्यात येणार, असल्याचे केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर म्हणाले.

 

आज केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्ष पदाचा पदभार हंसराज अहीर यांनी येथील केंद्रीय कार्यालयात स्वीकारला. पदभार ग्रहण केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

 

श्री अहीर  पुढे म्हणाले,  देशभरात इतर मागासवर्गात जवळपास अडीच हजार जाती आहेत. पोट जातींना धरून 5500 जाती इतर मागासवर्गात मोडतात. देशातील बहुतेक सर्वच राज्यांमध्ये मोठया संख्येने इतर मागासवर्ग जातीत मोडणारे लोक आहेत. या सर्वांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थ‍िक, सांस्कृतिक असा सर्वांगीण विकासासाठी मागासवर्ग आयोग कार्यरत असून तो अधिक प्रभावीपणे व्हावा यासाठी, प्रयत्न करणार असल्याचे श्री अहीर यावेळी म्हणाले.

 

यासह शासनाच्या योजनांचा लाभ देशातील सर्वच स्तरातील मागासवर्गापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आयोगाच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगीतल्याप्रमाणे या देशातील विषमता, असमानता संपविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. भारतीय संवधिानात हे अंर्तभूत आहे. त्याचप्रमाणे इतर मागास जातीतील सर्व वर्गांना न्याय देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचा पुनर्रोच्चार  श्री अहीर यांनी यावेळी केला .

                                                          ००००

No comments:

Post a Comment