Thursday, 29 December 2022

‘साहिबजादे’ यांना महाराष्ट्राचा मानाचा सलाम

 




महाराष्ट्र आणि पंजाब यांचे शतकांचे नातं आहे. हे नातं आत्मतीयेचे आहे. आंतरीक असे हे नातं आहे. संत नामदेव भारत भ्रमण करीत असताना पंजाबच्या घुमानमध्ये पोहोचले आणि तिथलेच झालेत. त्यांच्या वाणीत, कर्तृत्वात ऐवढे बळ होते. त्यांच्या अभंगांचा अंर्तभाव गुरू ग्रंथ साहेब मध्ये आहे. दशमेश (दहावे)गुरू गुरू गोविंदसिंग यांना ही महाराष्ट्रात यावेसे वाटले. नांदेडमध्ये त्यांच्या नावे सचखंड श्री हजूर साहेब असे शीख अनुयायांचे महत्वाचे तीर्थस्थळ आहे. हा काही योगायोग नसावा. अस व्हायचं असेल. म्हणूनच ते झालं.

महाराष्ट्र आणि पंजाब मध्ये असणारे साधर्म्य हे अनेक विषयात दिसून येते. स्वातंत्र्य पूर्व काळात महाराष्ट्र आणि पंजाब यांनी कित्येक क्रांत‍िकारांना जन्म दिला. देशाचे नेतृत्व केले. भगतसिंगासोबत हसत हसत फाशीवर चढणारे राजगुरू हे ही महाराष्ट्राचे.  महाराष्ट्र आणि पंजाब चे ऋणानुबंध  किती विशेष आहे. दोन्ही राज्यातील बहुसंख्य जनता ही कृषीनिगडीत व्यवस्थेवर आधार‍ित आहे. पंजाब रेंजीमेंट आणि मराठा रेजीमेंटच्या शौर्य गाथा आपण ऐकतच मोठे झालेलो आहोत. देशाच्या मातीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे महाराष्ट्र आणि पंजाब हे शौर्य आणि धाडस, आणि अध्यात्माची पंरपरा जोपसाणारे राज्य आहेत.

 

महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये  साहसाचे बाळकडू त्यांना घरूनच पाजले जाते.  माता गुजरी आणि गुरू तेगबहादूर यांच्याकडून अदम्य साहसाचे संस्कार गुरू गोविंदसिंग यांना मिळाले आणि पूढे हाच वारसा त्यांच्या साहिबजादेबाबा अजीत सिंग, बाबा जुझार सिंग तसेच छोटया साहिबजादे साहिबजादे बाबा जोराव‍रसिंग आणि बाबा फतेहसिंग यांना मिळाला. अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद त्यासाठी शेवटपर्यंत निसंकोचपणे शौर्याने उभे राहणे या साहिबजादयांचे आचरण ‘मूर्ती लहान आणि किर्ती महान’ अशीच आहे. त्यांना 26 डिसेंबर ला हौतात्म आले.

 

त्यांच्या या दिवसाला वीर बाल दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. पंजाब आणि महाराष्ट्र या राज्यांचा गुरू गोविंदसिंगशी असलेले नातं बघता या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना नवी दिल्ली येथे आयोजित उपक्रमास मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये येथे आंमत्रित करण्यात आले. 

  या ऐतिहास‍िक कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले संबोधन उपस्थितांच्या  ह्दयात भ‍िडले असल्याच्या भावना उपस्थितांच्या चेह-यावर दिसत होत्या. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या समागमनातील उपस्थिती आणि संबोधनामुळे पंजाब आणि महाराष्ट्राच्या नात्यात नव्याने दृढता निर्माण होईल.

 

अवघ्या 9 वर्ष आणि 6 वर्षांचे वय असणारे छोटे साहिबजादे बाबा जोराव‍रसिंग आणि बाबा फतेहसिंग यांनी अदम्य शौर्याचे परिचय देऊन आपले प्राण अर्पण करून स्वाभ‍िमानीपणाने शहादत दिली. त्यांच्यामध्ये गुरू गोविंदसिंग यांचे रक्त असल्यामुळे या साहबजादे यांनी अदम्य धाडस दाखविले. त्यांच्या या धाडसाला महाराष्ट्राच्या जनतेचा सलाम.

 

 

00000

 

अंजु निमसरकर

माहिती अधिकारी

No comments:

Post a Comment