Tuesday, 31 January 2023

महाराष्ट्र तीन पुरस्कारांनी सन्मानित

 




सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेत द्वितीय पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली,31 : यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर झालेल्या पथसंचलनात महाराष्ट्राच्यावतीने साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्तीहा चित्ररथ झळकला होता. या चित्ररथास केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री अजय भट यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय आणि लोकपसंतीत तृतीय पुरस्कार एका दिमाखदार सोहळ्यात आज प्रदान करण्यात आला. आंतरराज्य सांस्कृतिक स्पर्धेत राज्याचा द्वितीय क्रमांक आला होता. असे एकूण तीन श्रेणीतील पुरस्कारांनी यावर्षी महाराष्ट्राला सन्मानित करण्यात आले आहे.

            येथील छावणी परिसरातील  रंगशाळेत केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ या चित्ररथास सर्वोत्कृष्ट  चित्ररथाचा व्दितीय क्रमांकाचा लोकपसंतीत तृतीय  क्रमांकाचा पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी आणि त्यांच्या चमूने हे पुरस्कार स्वीकारले. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश  राज्यांच्या चित्ररथाला अनुक्रमे प्रथम आणि तृतीय क्रमांक प्रदान करण्यात आला आहे.आजच्या पुरस्कार प्रदान सोहळयात आंतरराज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेत्या राज्यांची नृत्य सादर करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राने धनगरी लोककला प्रकारातील नृत्य सादर केले. याच नृत्याला दिव्तीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

74 व्या प्रजासत्ताक दिनी आयोजित मुख्य कार्यक्रमातील चित्ररथांसाठी ‘नारी शक्ती’ वर आधारित संकल्पना मांडण्यात आली होती. त्याला अनुसरून राज्याने   साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ असा चित्ररथ उभारला होता. कर्तव्यपथावरील पथसंचलनात सर्वांचे लक्ष या चित्ररथाने वेधले होते. यामध्ये महाराष्ट्रातील अध्यात्मिक शक्ती असलेल्या साडेतीन पीठाचा देखावा, महाराष्ट्राची अमूर्त लोककला आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर शैली दर्शविण्यात आली होती. 

 

 

 

असा होता राज्याचा चित्ररथ

 

महाराष्ट्राने साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्तीचा महिमा चित्ररथाच्या माध्यमातून दर्शविला. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्तीपीठे तर वणीची सप्तश्रृंगी या अर्ध्या शक्तिपीठांचे दर्शन पथसंलनात सर्वांना घेता आले. या चित्ररथात संबळ वाजविणारे गोंधळी, पोतराज, हलगी वाजवून देवीची आराधना करणारा भक्त, असे भक्त‍िमय वातावरण कर्तव्यपथावर चित्ररथाच्यामाध्यातून दर्शविले होते. यामध्ये लोककलाकार हे देवीचे भक्तीगीत गात नृत्यकरून   “साडेतीन शक्तिपीठे दाखवित‍ी आम्हा दिशा..... गोंधळ मांडला ग आई गोंधळाला या अशी अर्चना करीत होते. 

 

उच्च स्तरीय समितीने निकषाच्या आधारे राज्याच्या चित्ररथाला व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार सोमवारी जाहिर केला. 

आतापर्यंत राज्याच्या चित्ररथाला  मिळालेले पुरस्कार

 

वर्ष 1970 ला राज्याने प्रथम चित्ररथ सादर केला होता.  राजधानीतील मुख्य पथसंचलनाच्या कार्यक्रमात राज्याच्या वैभवशाली ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास चित्ररथाच्या माध्यमाने दर्शविले आहे. 

 

राज्याला वर्ष 1981, 1983, 1993,1994, 1995, 2015, 2018 असे एकूण 7 वेळा प्रथम पुरस्कार पटकाविलेला आहे.  यामध्ये राज्याने 1993 ते  1995 असे सलग तीन वर्ष  प्रथम पुरस्कार पटकावून विक्रम नोंदविलेला आहे. 

वर्ष 1986, 1988,2009 असे तीन वेळा व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळविला आहे. वर्ष 2007 2017 मध्ये तिसरा क्रमांक राज्याने राखला होता. मागील वर्षी 2022 मध्ये लोकप्रिय चित्ररथाच्या श्रेणीत राज्याने प्रथम क्रमांक मिळविला होता. यावर्षी चित्ररथाला दुसरा आणि लोक पसंती या श्रेणीत तिसरा पुरस्कार मिळालेला आहे. असे एकूण 14 पुरस्कार आतापर्यंत राज्याला प्राप्त झाले आहेत.

यावर्षीच्या  चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची होती. शुभ ऍड या संस्थेने  चित्ररथाचे काम प्रत्यक्षात उतरव‍िले होते.  साडेतीन शक्तिपीठाची महिमा सांगणाऱ्या  गीताला संगीत सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी दिले. तर, हे गीत प्राची गडकरी यांनी लिहीले. यासह चित्ररथावर दिसणारे कलाकार हे विजनरी परफॉर्मिंग कला समुह, ठाणे येथील होते.

00000

Monday, 30 January 2023

महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर

 


 




साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती चित्ररथ प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर झळकला

नवी दिल्ली, ३० : 74 व्या प्रजासत्ताक द‍िनी कर्तव्यपथावरील पथसंचलनात महारष्ट्राच्यावतीने साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती या  चित्ररथाने उपस्थितांना आकर्षित केले. राज्याच्या चित्ररथास व्द‍ितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार जाहीर आज झाला आहे. उत्तराखंड राज्याला प्रथम क्रमांक तर उत्तर प्रदेश राज्याला तिसरा क्रमांक जाह‍ीर झाला. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने उत्कृष्ट चित्ररथाची निवड करण्यात आली असून मंगळवारी दुपारी निवड झालेल्या राज्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

            यावर्षी चित्ररथाची संकल्पना नारी शक्ती वर आधार‍ित होती. या संकल्पनेवर साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती असा मोहक चित्ररथ कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनी साकारण्यात आला. या चित्ररथाला  व्दितीय क्रमांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

            महाराष्ट्राने नारी शक्ती व साडे तीन शक्त‍िठाचा महिमा चित्ररथाच्या माध्यमातून दाखविला. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्तीपीठे तर वणीची सप्तश्रृंगी यार्ध्या शक्तिपीठांचे दर्शन पथसंलनात सर्वांना घेता आले. या चित्ररथात संबळ वाजविणारे गोंधळी, पोतराज, हलगी वाजवून देवीची आराधना करणारा भक्त, असे भक्त‍िमय  वातावरण कर्तव्यपथावर चित्ररथाच्यामाध्यातून दर्शविल्या गेले. यामध्ये लोककलाकार हे देवीचे भक्तीगीत गात नृत्यकरून   साडेतीन शक्तिपीठे दाखवित‍ी आम्हा दिशा..... गोंधळ मांडला ग आई गोंधळाला या अशी अर्चना करीत होते.

 चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची होती. शुभ ऍड या संस्थेने  चित्ररथाचे काम प्रत्यक्षात उतरव‍िले होते.  साडेतीन शक्तिपीठाची महिमा सांगणाऱ्या  गीताला संगीत सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी दिले. तर, हे गीत प्राची गडकरी यांनी लिहीले. यासह चित्ररथावर दिसणारे कलाकार हे विजनरी परफॉर्मिंग कला समुह, ठाणे येथील होते.

Saturday, 28 January 2023

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम ;‘प्रधानमंत्री बॅनर’विजेत्याचा बहुमान






नवी दिल्ली, दि. 28 : महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेते पद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

        येथील कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी रॅली मध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री बॅनर’ 2022-23 च्या विजेत्या व उपविजेत्यासह एनसीसीच्या बेस्ट कॅडेट्सला सन्मानित करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांच्यासह गणमान्य व्यक्ती यावेळी उपस्थित होते.

        यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास प्राप्त विजेतेपदाचा चषक महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट सुकन्या राणा दिवे, सिनियर अंडर ऑफिसर देवेंद्र बडगुजर, संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय.पी.खंडुरी यांनी प्रधानमंत्री बॅनर स्विकारले.देशातील एकूण 17 एनसीसी महासंचालनालयाच्या डिसेंबर 2021 ते नोव्हेंबर 2022 मधील विविध स्तरावरील मुल्यांकन तसेच यावर्षी 1 ते 28 जानेवारी दरम्यान दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिन शिबिरातील विविध स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर आज ‘प्रधानमंत्री बॅनर’चा बहुमान विजेत्या व उपविजेत्या संचालनालयास प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्राला विजेत्याचा तर तामिळनाडू ,पुद्दूचेरी आणि अंदमान एनसीसी संचालनालयास उपविजेतेपदाचा बहुमान प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्राला सात वर्षानंतर सलग दुसऱ्यांदा प्रधानमंत्री बॅनर

        महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला यापूर्वी एकूण 18 वेळा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाला आहे. मात्र,गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्र उपविजेता किंवा पहिल्या तीन क्रमांकात असायचा. मात्र राज्याने मुसंडी घेत मागील वर्षी हा प्रधानमंत्री बॅनरचा मान पटकाविला होता. यावर्षीही महाराष्ट्राने हा बहुमान मिळविल्याने राज्याला तब्बल सात वर्षाने सलग दोन वर्ष प्रधानमंत्रीबॅनर पटकावून उत्तम कामगिरी केली आहे.

00000



 

Friday, 27 January 2023

मराठी भाषेला म‍िळालेली समृध्द संपदा वाढवूया : डॉ. ज्ञानेश्वर मुळे

 


    

नवी दिल्ली,27 : मराठी भाषेला मिळालेली समृध्द संपदा वाढवूया तसेच अधिकाधिक उत्तम दर्जाचे साहित्य मराठी भाषेत निर्माण करूया, असे प्रतिपादन राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे सदस्य तसेच ज्येष्ठ साहित्य‍िक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आज येथे केले.

 

महाराष्ट्र परिचय केंद्रात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने आर्याबागया वर्षारंभ विशेषांकाच्या प्रकाशन  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. ज्ञानेश्वर मुळे बोलत होते. याप्रसंगी  परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव विश्वास सपकाळ, परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा, माहिती अध‍िकारी अंजु निमसरकर, ग्रंथपाल रामेश्वर बर्डे यांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. हा विशेषांक परिचय केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

 

श्री मुळे पुढे म्हणाले, महाराष्ट्राचा आणि  मराठी भाषेचा समृद्ध असा इतिहास आहे. मराठी भाषा ही भावनांसह लोककला, साह‍ित्य, लोकगीते, लोकनाटय यासर्वांची संवाहक अशी ही भाषा आहे. मराठी भाषेत गेल्या 1500 वर्षात अनेक महाग्रंथ, दीर्घ  कविता, खंडकाव्य निर्माण झालेले आहेत. तर अलीकडच्या काळात कांदबरी, कथा, लोककथा, निबंध  अशा प्रकारचे विपूल साहित्य मराठीत  निर्माण झाले आहे.

 

 महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेसह महाराष्ट्रा बाहेरील मुळ मराठी मातीशी जुळलेली 2 कोटी जनताही मराठीत बोलते ही अभिमानाची बाब आहे. भारताचे वैशिष्टये हे भाषा वैविध्यपूर्ण असे आहे. जसे आपण जैववैविध्य जपतो तसेच आपल्याला भाषा वैविध्य ही जपता आले पहिजे. आज तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे सर्वच भारतीय भाषांवर संक्रात आली असल्यामुळे  दूसऱ्या भाषेचा प्रभाव वाढत चाललेला आहे. आपली साह‍ित्याची समृद्ध  पंरपरा जर टिकवायची असेल तर या साहित्य संपदेला पूढे नेऊ या, यात अधिकाध‍िक दर्जेदार साहित्य निर्माण करू या, दैंनदिन व्यवहारात मराठीचा वापर करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  महाराष्ट्र शासन राबवित असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सारख्या उपक्रमात जास्तीत जास्त मराठी लोकांनी भाग घेतला पाहिजे, असे ही ते यावेळी म्हणाले. डॉ. मुळे यांनी आर्याबाग या अंकात त्यांनी  लिहीलेल्या कवितेचे वाचन याप्रसंगी केले.

 

विश्वास सपकाळ म्हणाले, आपण कोणत्याही क्षेत्रात काम करा, मात्र आपली समृद्ध संस्कृती, साहित्य कसे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविता येईल याचा देखील प्रयत्न व्हायला हवा.    फिजी आणि नौरू येथे राजदूत असताना हाय कमीशनच्या माध्यमातून मराठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून येथील लोकांना महाराष्ट्रातील संस्कृतीचा परिचय करून दिल्याच्या आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या.

 

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवरून दररोज महाराष्ट्रातील कवी त्यांच्या स्वरचित रचनेचे  काव्य वाचन करतात. महाराष्ट्र सदन येथे दर्शनीय ठिकाणी मराठीमध्ये़ सुविचार लिहीले जात आहे. येथील नुतन मराठी शाळेत काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. यासह मराठी चित्रपट, मराठी भाषेच्या महतीवर आधारित व्याख्याने, असे कार्यक्रम केले गेले आहेत.   

Wednesday, 25 January 2023

महाराष्ट्राला 74‘पोलीस पदक’ जाहीर







नवी दिल्ली, दि. 25 :पोलीस पदकांची घोषणा झाली असून, यात महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना पुरस्कार जाहीर झाला. यातील चार पोलीस अधिका-यांना प्रतिष्ठित सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम) 31 पोलीस शौर्य पदक’ (पीएमजी) तर प्रशंसनीय सेवेकरिता 39पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी  एकूण 901 पोलीस पदक जाहीर झाली असून 93  पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक' (पीपीएम), 140 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 668 पोलिसांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाले असून यात महाराष्ट्राला एकूण 74 पदके जाहीर झाली आहेत.  

                        देशातील 93 पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना  उत्कृष्ट सेवेकरिता  राष्ट्रपती  विशिष्ट सेवा पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्राच्या चार अधिकारी –कर्मचा-यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे.       

चार ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम)

 

1.      श्री.देवेन त्रिपुरारी भारती, अतिरिक्त पोलिस महासंचालक, राज्य सुरक्षा कोऑपरेशन, मुंबई

2.      श्री.अनुप कुमार सिंह, अतिरिक्त पोलिस महासंचालक, मुंबई,

3.      श्री. संभाजी नारायण देशमुख, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी (पोलिस उपनिरीक्षक), मुंबई,

4.    श्री.दीपक धनाजी जाधव, पोलिस उपनिरिक्षक, ठाणे

 

राज्यातील एकूण 31 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक(पीएमजी)

1.          मनीष कलवानिया, आयपीएस, अतिरिक्त पोलीस अधीक्षक(1st BAR To PMG)

2.         संदिप पुंजा मंडलिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक(2nd BAR To PMG)

3.         राहूल बाळासो नामाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक

4.        सुनिल विश्वास बागल, पोलीस उपनिरीक्षक

5.         देवेंद्र पुरूषोत्तम आत्राम, नाईक-पोलीस हवालदार *

6.         गणेश शंकर दोहे, पोलीस हवालदार

7.        एकनाथ बारीकराव सिडाम, पोलीस हवालदार

8.         प्रकाश श्रीरंग नरोटे, पोलीस हवालदार

9.         दिनेश पांडुरंग गावडे, पोलीस हवालदार

10.     शंकर दसरू पुंगटी, पोलीस हवालदार

11.      योगीराज रामदास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक

12.     अमोल नानासाहेब फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक

13.     सदाशिव नामदेव देशमुख, पोलीस उपनिरीक्षक

14.    प्रेमकुमार लहु दांडेकर, पोलीस उपनिरीक्षक

15.     राहूल विठ्ठल आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक

16.     देवाजी कोटूजी कोवासे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

17.    राजेंद्र अंतराम मडावी, मुख्य हवालदार

18.     नांगसू पंजामी उसेंडी, नाईक पोलीस हवालदार(1st BAR To PMG)

19.     देवेंद्र पुरूषोत्तम आत्राम, नाईक पोलीस हवालदार (1st BAR To PMG)

20.     प्रदिप विनायक भासरकर, नाईक पोलीस हवालदार

21.     सुधाकर मानु कोवाची, पोलीस हवालदार

22.     नंदेश्वर सोमा मडावी, पोलीस हवालदार

23.     सुभाष भजनराव पाडा, पोलीस हवालदार

24.   भाऊजी रघू मडावी, पोलीस हवालदार

25.    शिवाजी मोडु उसेंडी, पोलीस हवालदार

26.     गंगाधर केरबा कऱ्हाड, पोलीस हवालदार

27.    रामा मैनु कोवाची, पोलीस हवालदार

28.    महेश पोचम मदेशी, पोलीस हवालदार

29.     स्वप्नील केसरी पाडा, पोलीस हवालदार

30.     तानाजी दिगंबर सावंत, पोलीस निरीक्षक

31.     नामदेव महिपती यादव, पोलीस हवालदार

 

राज्यातील 39 पोलीसांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलिस पदक (PM) 

 

1.      श्री जयकुमार सुसाईराज, विशेष पोलीस महानिरीक्षक,कुलाबा, मुंबई

2.      श्री लखमी कृष्ण गौतम, पोलिस अधिक्षक,विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय,कुलाबा, मुंबई

3.      श्री निशीथ वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपाडा, मुंबई

4.    श्री संतोष गणपतराव गायके, पोलीस उपअधिक्षक, गोरेगाव ,मुंबई 

5.     श्री चंद्रकांत विठ्ठल मकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, दादर (पूर्व),मुंबई 

6.      श्री दिपक राजाराम चव्हाण, पोलीस निरीक्षक, मांटुगा (पूर्व) ,मुंबई

7.     श्री. रमेश विठ्ठलराव कठार, पी.डब्ल्यु.आय (इजिनिंअर) औरंगाबाद परीक्षेत्र

8.     श्री. देविदास काशीनाथ घेवारे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती

9.      श्री. सुधाकर पंडितराव काटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

10.  श्री. शैलेश दिगांबर पासलवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई

11.   श्री. मनोज श्रीकांत नेर्लेकर,पोलीस उपअधिक्षक, वरळी , मुंबई

12.  श्री. शाम खंडेराव शिंदे , पोलीस निरीक्षक, नवी मुंबई

13.  श्रीमती अलका सदाशिव देशमुख, पोलीस निरीक्षक, ठाणे शहर

14.श्री. दत्तात्रय भंगवतराव पाबळे, पोलीस निरीक्षक, डी.एन. रोड, मुंबई

15. श्री. बापू तुळशीराम ओवे, पोलीस निरीक्षक, गोरेगांव (पूर्व), मुंबई

16.  श्री. प्रसाद दशरथ पांढरे, पोलीस निरीक्षक, ठाणे

17. श्री. शिरीष क्रिशनाथ पवार, पोलीस निरीक्षक, खोपोली पोलीस स्टेशन

18. श्री. सदाशिव एलचंद पाटील, कमांडंट, धुळे

19.  श्री. सुरेश पुंडलिकराव गाठेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, वाशिम

20. श्री. दिलीप तुकाराम सावंत, गुप्तचर अधिकारी, एस.आय.डी, मुख्यालय, मुंबई

21.  श्री. संतोष सखाराम कोयंडे, पोलीस उपनिरीक्षक, मुंबई

22. श्री. चंद्रकांत गुणवंतराव लांबट, पोलीस उपनिरीक्षक, रामनगर, चंद्रपूर

23. श्री. झाकिरहुसेन मौला किल्लेदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, घाटकोपर , मुंबई

24.    श्री. भरत अप्पाजी पाटील, पोलीस निरीक्षक, मुंबई

25. श्री. प्रमोद गंगाधरराव कित्ते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,अमरावती

26.  श्री. आनंद भिमराव घेवडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, रायगड

27.श्री. सुखदेव खंडू मुरकुटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नाशिक

28.  श्री. गोकुळ पुंजाजी वाघ, मुख्य हवालदार, औरंगाबाद

29. श्री. धनंजय छबनराव बारभाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, विशेष शाखा, पुणे शहर

30. श्री. सुनील विश्राम गोपाळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई

31.  श्री. दत्तात्रय राजाराम कडनोर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नाशिक शहर

32. श्री. ज्ञानेश्वर पंढरीनाथ आवारी, पोलीस निरीक्षक, मुंबई

33. श्री. रामकृष्ण नारायण पवार, पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे

34.    श्री. ओमप्रकाश गंगाधर कोकाटे, पोलीस निरीक्षक, नागपूर ग्रामीण

35. श्री. सुभाष भीमराव गोईलकर, पोलीस उपनिरीक्षक, विरार (पूर्व) पालघर

36. श्री. संजय सिध्दू कुपेकर, पोलीस उपनिरीक्षक लव्हलेन रोड, मुंबई

37.श्री. प्रदीप केडा अहीरे, पोलीस उपनिरीक्षक ,ठाणे

38. श्री. प्रकाश हरीबा घाडगे, पोलीस उपनिरीक्षक, कांदीवली पोलीस स्टेशन ,मुंबई

39. श्री. विजय उत्तम पवार, पोलीस उपनिरीक्षक,फोर्ट, मुंबई 

 

००००००