Tuesday, 14 February 2023

‘भारत रंग महोत्सवा’त दिल्लीसह अन्य शहरात 6 मराठी नाटके

 




वी दिल्ली, 14 : प्रतिष्ठ‍ित राष्ट्रीय नाटक विद्यालयातंर्गत होणाऱ्‍ या 22 व्या भारत रंग महोत्सवात दिल्लीसह अन्य शहरात 6 मराठी नाटके प्रस्तुत केली जातील. दिल्लीत 2, नाशिकमध्ये 3 आणि केवड‍िया येथे  1 असे एकूण सहा नाटके दाखविली जाणार आहेत.

22 वा भारत रंग महोत्सव मंगळवारपासून सुरू आहे. केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, सुप्रसिद्ध अभिनेते परेश रावल, नाटक दिग्दर्शक तथा अभिनेते  राम गोपाल बजाज, अभिनेत्री आणि निर्माता वाणी त्रिपाठी टिक्कू, राष्ट्रीय नाटक विद्यालयाचे संचालक रमेश चंद्र गौर यांच्या उपस्थित‍ित कॉपरर्निकस मार्ग येथील कमानी सभागृहात मुख्य कार्यक्रम सोहळयाचे उद्घाटन होईल. यावर्षी दिल्लीसह अन्य दहा शहरात भारत रंग महोत्सव साजरा होत आहे. दिल्ली, नाशिक आणि केवडिया (गुजरात) येथे  मराठी नाटक प्रस्तुत केले जाणार आहे.

दिल्ली येथे रविवार  19 फेब्रुवारीला सांयकाळी 6 वाजता  शब्दांची रोजनिशी हे नाटक दाखविले जाईल. गुरूवारी  23 फेब्रुवारीला सांयकाळी 6.30 वाजता मराठी कर्ण (दशावतार) हे नाटक दाखविले जाईल. हे दोन्ही नाटके कमानी सभागृहात दाखविले जातील.

नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने महाकवी कालीदास कलामंदीर सभागृह येथे  18, 20 तसेच 23 फेब्रुवारीला संगीत मत्स्यगंध, विश्वामित्र, संगीत सुवर्णतुला ही नाटके प्रस्तुत केली जाणार आहेत.  केवड‍िया येथे गुजरात स्टेट संगीत नाटक अकादमीच्या सहकार्याने एकता सभागृहात 23 फेब्रुवारीला  तेरव हे नाटक दाखविले जाणार आहे.   यासह महाराष्ट्रातील हिंदी नाटक समुहाचे नाटकेही दिल्लीसह अन्य शहरात दाखव‍िली जाणार आहेत.

No comments:

Post a Comment