नवी दिल्ली, 03 : पारनेर मतदार संघाचे आमदार श्री. निलेश लंके यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला आज सदिच्छा भेट दिली.
परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक, अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री.लंके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यालयातील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती अरोरा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे करण्यात येणारे कार्य, प्रकाशित करण्यात येणारी प्रकाशने, प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय, कार्यालयाच्या सोशल मिडीयाव्दारे देण्यात येणारी माहिती, दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांशी साधण्यात येणारा समन्वयाबाबत माहिती दिली. तसेच, परिचय केंद्रा मार्फेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही दिली. श्री. लंके यांना यावेळी “लोकराज्य” मासिकाची प्रत भेट करण्यात आली.
श्री. लंके यांनी कार्यालयाची पाहणी केली. ग्रंथालयात उपलब्ध असलेली पुस्तके तसेच दुर्मिळ हस्तलिखित दिवाळी अंकांची पाहणी केली. या हस्तलिखित दिवाळी अंकांचे डिजिटायजेशन केल्यास मराठी भाषिकांना दुर्मिळ अंक वाचायला मिळतील, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी परिचय केंद्राच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक श्री. महेंद्र पठारे, सतीश भालेकर, पोटघन मेजर यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment