Wednesday, 29 March 2023

‘स्वच्छोत्सवा’त महाराष्ट्रातील 12 स्वच्छता दूत महिलांचा सहभाग

 


नवी दिल्ली, 29 : स्वच्छ भारत मिशन-नागरी अंतर्गत साजरा करण्यात आलेल्या स्वच्छोत्सवात महाराष्ट्रातील 12 स्वच्छता दूत महिलांचा सहभाग असून अन्य राज्यातील एकूण 300 स्वच्छता दूत महिला उपस्थित होत्या.

येथील हॅबीटॅट सेंटर मध्ये केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ भारत मिशन- नागरीच्या अंतर्गत स्वच्छोत्सव उपक्रमात आंतरराष्ट्रीय शुन्य कचरा दिवस (International day of Zero Waste) राबविण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय गृहनिर्माण नागरी व्यवहार मंत्री हरदिप सिंग पूरी, सचिव मनोज जोशी आणि अन्य वरीष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यातून स्वच्छ भारत अभियानाचे सहायक आयुक्त महेश चौधरी उपस्थित होते.

यामध्ये देशभरातील स्वच्छता क्षेत्रातील कार्यरत निवडक बचत गटातील प्रातिधिनिक महिला स्वच्छता दूत या कार्यक्रमास उपस्थित होत्या. महाराष्ट्रातील  नगरपालिका, महानगरपालिकेतील एकूण 12 महिलांचा समावेश होता.

बचत गटांच्या माध्यमातून स्वच्छेतेशी संबंधित काम करीत असतांना मान, सन्मान आणि धन आयुष्यात कमविता  आले असल्याची भावना यावेळी सर्वच महिलांनी व्यक्त केली. हाताला मिळालेले  कोणतेही काम लहान मोठे नसुन त्यातून मिळणारे समाधान महत्वाचे असल्याची प्रतिक्रीयाही यावेळी या महिलांनी दिली.

 

महाराष्ट्रातून  सहभागी महिला स्वच्छता दुत

महाराष्ट्रातील नगरपालिका महानगरपालिकतून  निवडक 12 महिला स्वच्छता दूत  या स्वच्छोत्सव कार्यक्रमास उपस्थित होत्या. यामध्ये  नागपूर महानगरपालिकेने  सावित्री बचत गटाला भंगार विक्रीसाठी दिनदयाळ अंत्योदय योजने अंतर्गत  प्रोत्साहन दिले असल्याचे  बचत गटाच्या संगीता रामटेके यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील  जोत्सना झुमनाके या कावेरी बचत गटामार्फत डंपींग यार्ड चे काम करतात.  यामध्ये त्या  ओला आणि सुखा कचरा वेगवेगळा करून त्यातून कपोस्ट आणि वर्मी कपोस्ट खत तयार करतात.

परभणी महानगरपालिकेच्या नव उमेद वस्ती स्तरच्या अध्यक्षा चतुरा चव्हाण यांनी स्वत:च्या टेरेसवर गार्डन करून भाज्या प‍िकविल्या. पुढे त्यांनी कंपोस्‍ट खत ब‍नविण्याचे प्रशिक्षण घेतले. आता त्या इतरांना प्रशिक्ष‍ित करतात. परभणीच्याच जनहीत संस्थेच्या उपाध्यक्ष तस्लीम पठाण या ही ओला कचरा आणि सुखा कचरा वेगळा करून त्यातून कपोस्ट खत बनविण्याचे ते काम करतात आणि इतरांनाही प्रशिक्ष‍ण देतात. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीच्या रूखसाना या देखील ओला कचरा सुखा कचरा वेगवेगळा करण्याचे काम करतात. यातून त्या कंपोस्ट खत, गांडूळ खत, वर्मी खत तयार करून हे खत विकतातअकोल्यातील अशोका वस्ती स्तर संघाच्या पुष्पा राऊत यांना अकोला  महानगरपालिकेचे सार्वजनिक शौचालय स्वच्छता करण्याचे कंत्राट मिळालेले आहे. त्यांच्यासह 10 महिला या कामात आहेत. अकोल्याच्याच निर्भया वस्ती स्तर संघाच्या आरती मेघे यांनी शहरात घंटा गाडी आणि सार्वजनिक पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले असून त्यात त्यांना यश मिळाले. यासह त्यांचा समुह सार्वजनिक शौचालय स्वच्छता राखण्याचे काम करतो.

 भुसावळ येथील मल्ल्हारी वाघ या आलो आणि सुखा कचरा वेचण्याचे काम करतात. नाशिकवरून आलेल्या  रत्नमाला पात्रे याही  ओला कचरा सुखा कचरा वेचतात. जालन्याच्या श्रीमती लोखंडे या घंटा गाडीत कचरा गोळा करण्याचे काम करतात. मालेगाव नगरपालिकेच्या स्वच्छता कामगार कमला धिवरे या ही प्रतिनिधी म्हणुन उपस्थित होत्या. राजधानी दिल्लीत या स्वच्छता दूतांचा झालेल्या सन्मानामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो कराhttp://twitter.com/MahaGovtMic

अंजु निमसरकर /वि.वृ.क्र. 56/दि.29.03.2023

 

No comments:

Post a Comment