Tuesday, 18 April 2023

विदर्भ आणि मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मिळणार गती - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील




नवी दिल्ली दि. 18 : विदर्भ आणि मराठवाडा विभागाच्या दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या  प्रकल्पांना गती मिळणार असल्याची माहिती, राज्याचे महसुल, दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे सांगितले.

 

दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या  प्रकल्पांच्याअंमलबजावणी संदर्भात तसेच पशुसंवर्धन विषयाशी निगडीत आज महत्वपूर्ण बैठक झाली याबैठकीस केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग  मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थित त्यांच्या शासकीय निवास बैठकीचे आयोजन करण्यात आले. याबैठकीस केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव‍िकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री पुरूषोत्तम रूपाला  यांच्यासह केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            बैठकीनंतर श्री विखे पाटील यांनी सांगितले, दुग्ध विकास आणि पशु संवर्धन संदर्भात पहिला टप्पा पुर्ण झालेला असून दुसऱ्‍ या टप्प्याची सुरूवात करण्यासंदर्भात आज महत्वाची बैठक झाली. यामध्ये  येणाऱ्या अडचणी केंद्र शासनासमोर  मांडण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाने सर्वोतोपरी मदत करू असे सकारात्मक आश्वासन दिले असून दुसऱ्या टप्प्याचे काम मिशन मोडवर करण्यात येईल, अशी माहिती श्री विखे पाटील दिली.

            श्री विखे पाटील म्हणालेविदर्भ आणि मराठवाडा विभागात दुग्धविकास प्रकल्पालाच्या प्रथम टप्प्यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश होता, आता यामध्ये गडचिरोली या जिल्ह्याचाही समावेश करण्यात आलेला आहे. मराठवाडयातील धाराशिव, लातूर, नांदेड, जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रथम टप्प्याच्या सुरूवातीला शेतकऱ्यांकडून प्रतिदिन  170 लीटर दुध मदर डेयरी घेत असे आता प्रतिदिन 3 लाख लीटरपर्यंत क्षमतेत वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. 

            दुसऱ्या टप्प्यात 11 हजार जनावरांचे वाटप करण्यात येणार  असून  20 हजार मेट्रीक टन प्रजनन क्षम पशु खाद्य देण्यात येणार असल्याचेही श्री विखे पाटील यांनी सांगितले.  यासह 12 हजार एकर क्षेत्रात पशु खाद्याची लागवड करण्यात येणार आहे. सोबतच 10 हजार कडबा कुट्टी यंत्र लावण्यात येतील. 1 लाख 62 हजार वांझ जनावरांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तर,  10 लाख कृत्रिम रेतन करण्यात येईल अशी माहिती ही त्यांनी दिली. राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाकडून  11 हजार बायोगॅस चे युनिट वाटप केले जाईल. प्रत्येका जिल्ह्यात मोबाईल वेटनरी युनिट सुरू करण्यात येणार असल्याचे   माहिती श्री विखे पाटील सांगितले.

00000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अंजु निमसरकर /वि.वृ.क्र. 70 /दि.18.4.23                              

 

No comments:

Post a Comment